आंधळगाव ग्रामपंचयतीकडून सलग चौथ्यांदा ग्रामसभा घेण्यास चालढकल ग्रामस्थामधून कारभाराबाबत तीव्र नाराजी.. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, १ सप्टेंबर, २०१९

आंधळगाव ग्रामपंचयतीकडून सलग चौथ्यांदा ग्रामसभा घेण्यास चालढकल ग्रामस्थामधून कारभाराबाबत तीव्र नाराजी..


मंगळवेढा/प्रतिनिधी

मंगळवेढा तालुक्यातील अंधळगाव येथील 31 ऑगस्टच्या ग्रामसभेला सरपंच व प्रशासनाचे कोणतेही अधिकारी न फिरकल्यामुळे चौथ्यांदा पुढे ढकलली असून  ग्रामपंचायतीचा सावळा गोंधळ समोर येत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असून 1मे व 31ऑगस्ट ची ग्रामसभा घेण्यास टाळाटाळ करणार्याविरोधात कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थामधून होत आहे  याबाबत अधिक माहिती अशी की मंगळवेढा तालुक्यातील अंधळगाव येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा दि 31ऑगस्ट रोजी सरपंच शांताबाई भाकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची नोटीस येथील  ग्रामपंचायतीच्या माहीती फलकावर लावली होती   त्यानुसार ग्रामस्थ व काही सदस्य ठरलेल्या 9 वाजलेच्या वेळेपासून साडेअकरा पर्यंत वाट पहात थांबले होते परन्तु सरपंच व प्रशासनाच्या कोणत्याही अधिकार्याने ग्रामसभेसाठी उपस्थित न राहता  ग्रामस्थाना वेठीस धरले तसेच ग्रामसभा  होणार आहे की नाही हे सांगण्यासाठी सुद्धा येथील जबाबदार व्यक्ती समोर आली नाही त्यावेळी ग्रामस्थातीलच एकाने सरपंच व इतर अधिकारी उपस्थित नसल्याने ही ग्रामसभा स्थगित करण्यात आल्याचे सांगून पुढील सात दिवसांनी ही सभा घेतली जाईल असे सांगितले सध्या ग्रामसेवक संपावर असल्याने या सभेसाठी उपस्थित राहू शकले नाहीत त्यामुळे ग्रामपंचायतीने येथील  ग्रामपंचायतच्या कारभाराची कोणतीही माहिती नसलेल्या अंगणवाडी सेविकेस पत्र देऊन सचिव म्हणून काम करण्यास सांगितले परन्तु त्या निघून गेल्या  सरपंच यांनी ग्रामसभेला उपस्थित राहून ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेणे आवश्यक असताना त्यांनीही ग्रामसभेला पाठ फिरवल्याने ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत शंका उपस्थित केली जात आहे विद्यमान सत्ताधारयानाचा सुरू असलेला अनागोंदी कारभार उघड होवू नये यासाठी  ग्रामसभा घेण्यास टाळाटाळ होत असल्याची चर्चा आहे गावात सध्या  चुकीच्या पद्धतीने सुरू असलेले काँक्रीटीकरणाचे काम रखडले असून याबाबत ग्रामपंचायत मार्ग काढण्याऐवजी विलंब लावून जबाबदारी टाळत आहेत ग्रामपंचायत पदाधिकाऱयांनी 1मे ची ग्रामसभा देखील घेतली आणि आता   31 ऑगस्टची ग्रामसभा देखील घेण्यास टाळाटाळ केल्याने ग्रामपंचयटीच्या कारभाराबाबत नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे  याबाबत विस्ताराधिकारी  साळुंखे यांच्याशी संपर्क साधला असता त्यानी ग्रामसेवक संपावर असल्याचे सांगून ग्रामपंचायतीने ग्रामसभेचे नियोजन करणे गरजेचे असल्याचे सांगितले
test banner