तुकाराम महाराजांनी केले १०१गणेश मुर्तीचे वाटप - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, २ सप्टेंबर, २०१९

तुकाराम महाराजांनी केले १०१गणेश मुर्तीचे वाटप


      मंगळवेढा (प्रतिनिधी )भुयार(चिक्कलगी) ता.मंगळवेढा मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज यांनी सालाबादप्रमाणे याही वर्षी जत व मंगळवेढा तालुक्यात जवळपास १०१ गणेश मुर्तीचे वाटप करण्यात आले.
       महाराष्ट्रात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविली जाते. हीच संकल्पना लोकांच्या मनात खोलवर रुजली पाहीजे हा उदात्त हेतू ठेऊन महाराजांनी ग्रामीण भागातील मंडळाना मागणीनुसार मोफत गणेशमुर्ती वाटप करण्याचे ठरविले व गणेश चतुर्थीच्या दिवशी सगळ्या मंडळांना मोफत गणेश मूर्ती देऊन त्याचबरोबर एक रोपटे देऊन मंडळातील कार्यकर्त्यांना सामाजिक संदेश दिला समाजातील ऐक्य टिकून राहिले पाहिजे ही भावना प्रत्येकाने जोपासले पाहिजे असे त्यांचे मत आहे
       यंदाच्या वर्षी आपल्याकडे खूप मोठा दुष्काळ आहे तर राज्याच्या एकीकडे पूर परिस्थिती असताना अनावश्यक खर्च टाळून त्याच खर्चाचा दुष्काळावर व पूर स्थितीत असणाऱ्या लोकांना मदत केली तर खऱ्या अर्थाने गणेश उत्सव साजरा केल्याचे आनंद प्रत्येकाला मिळेल.
      तुकाराम महाराज यांनी जत तालुक्यातील मंडळांना संख येथील मठात मोफत गणेश मूर्ती वाटपाचे नियोजन केले होते तर मंगळवेढा तालुक्यातील चिक्कलगी, मारोळी ,सलगर बुद्रुक, शिरनांदगी या परिसरातील मंडळांना मोफत गणेश मूर्ती  भुयार मठात नियोजन केले होते दरवर्षी तुकाराम महाराज मंडळांना सामाजिक सलोखा राखण्याचे आव्हान करत असतात .

फोटो - मारोळी बसवेश्वर गणेश मंडळाला गणेश मुर्ती स्वीकारताना पोलिस पाटील शिवराज पाटील
test banner