मंगळवेढा(प्रतिनिधी) कॉग्रेस- राष्ट्रवादी सरकार मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील डझनभर मंत्री होते.पण त्यांच्या काळात एकही सिंचन प्रकल्प पुर्ण झाले नाही. पण आम्ही कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प पुर्ण करून दाखवू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर येथे भाजपा महाजनादेश यात्रा समारोप आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,सहकारमंत्री सुभाष देशमुख,पालकमंत्री विजयकुमार देशमुख,सदाभाऊ खोत, खा.डॉ.जयसिध्देश्वर महास्वामी,खा.रणजीतसिंह नाईक-निंबाळकर,विकास महात्मे,मा.खा विजयसिंह मोहिते-पाटील,महाराष्ट्र प्रभारी भुपेंद्र यादव,आ.सुरेश हाळवणकर,सुजितसिंह ठाकुर,रघुनाथ कलुकर्णी, प्रशांत परिचारक,रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेद्र राऊत,उत्तम जानकर,जिल्हाध्याक्ष शहाजी पवार,शहरध्याक्ष विक्रम देशमुख आदी उपस्थित होते. पुढे मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस म्हणाले की,कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस म्हणजे बुध्दू पोरासारखे आहेत.ते नेहमीच ईव्हीएम मुळे आमची सत्ता गेल्याचे सांगतात. मात्र
२००४ ते
२०१४ या काळात पंचायतपासून ते लोकसभेपर्यंतच्या निवडणूका या ईव्हिएम व्दारे झाल्या.त्यावेळी आम्ही काहीच म्हटले नाही.आता त्यांची खोपडी खराब झाली आहे.जनाजनात-मनामनात आता फक्त नरेंद्र मोदी हेच आहेत.राज्यात पुन्हा भाजपा शिवसेनेचे सरकार येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.ही यात्रा काढण्यामागचे कारणही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.