जिजामाता महिला पतसंस्था मंगळवेढा या संस्थेची 34 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज श्री लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय येथे पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या चेअरमन सौ आशा रामकृष्ण नागणे या विराजमान होत्या. यावेळी संस्थेच्या ज्येष्ठ सभासद भगिनी, चेअरमन व संचालिका यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून वार्षिक सभेला सुरुवात झाली.
यावेळी संस्थेचे सचिव श्रीकांत जाधव यांनी प्रास्ताविक व विषय वाचन केले. संस्थेला अहवाल सालात रुपये दोन कोटी 35 लाख एवढा नफा झाला असून ऑडिट वर्ग अ मिळालेला आहे. संस्थेचे चेअरमन व संचालिका यांनी सभासदांना 15 टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेतलेला आहे. दिनांक 04 सप्टेंबरपासून सभासदांनी लाभांश संस्थेच्या कार्यालयातून घेऊन जाण्याचे आव्हान संस्थेचे सचिव श्रीकांत जाधव यांनी केले केले.
यावेळी मंगळवेढा तालुक्यातील पहिल्या महिला पिग्मी एजंट होण्याचा मान ज्यांनी मिळविला त्या आपल्या संस्थेच्या पिग्मी एजंट श्रीमती आशा शिवाजी सावंत यांचा सेवा निवृत्ती निम्मीत संस्थेचे चेअरमन सौ. आशाताई नागणे यांच्या हस्ते सन्मानाने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
विविध परिक्षेत उज्वल यश संपादन केल्या बद्दल श्रृती अविनाश गणेशकर, ज्ञानेश्वरी विश्वास माने, प्रेरणा येताळा मुरडे, प्रज्ञा उत्तम दिवसे, स्वाती सदाशिव वाघ, आकांक्षा रघुनाथ खरात, विशाखा शिवाजी मुढे, क्रांती नारायण माने, अनिकेत शिवाजी मुढे, सई दिलीप माने, यश तानाजी पवार, रेणु रामजी आवताडे, सौरभ शिवाजी मुढे, स्नेहल उत्तम भगरे, शुभम तुकाराम भगरे, सायली सुभाष पाटील, निशांत रामकृष्ण नागणे या सभासदांच्या पाल्यांचा गुणगौरव करून त्यांना भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा देऊन सामाजिक बांधिलकी संस्थेने जपलेली आहे.
सभेच्या अध्यक्षस्थानावरून सभासदांना संबोधित करताना चेअरमन सौ आशाताई नागणे यांनी संस्थेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतक यांच्या सहकार्यामुळे व संस्थेवरील विश्वासामुळेच आज पतसंस्थेची घोडदौड सुरू आहे. संस्थेची पुढील काळात अशीच प्रगती होण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे आणि तुम्ही सर्वजण सहकार्य कराल असा विश्वास आशाताई नागणे यांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थिता सभासदांना बचत कश्याप्रकारे करावी याविषयी मार्गदर्शनही केले.
या सभेस संस्थेचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालिका,तसेच बहुसंख्येने सभासद वर्ग, हितचिंतक व पतसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.
सभेचे सूत्रसंचालन सौ. मेघा कोंडुभैरी व लहुराज जगताप यांनी केले व सर्व उपस्थितांचे आभार श्री. अजित सावंत यांनी मानले.