उमेदवारीची शाश्वती नसल्याने भालकेंचा भाजपा प्रवेश रखडला! आ.भारत भालके यांना भाजपात परिचारक यांचा तर सेनेत शैला गोडसे यांचा अडथळा - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, ३१ ऑगस्ट, २०१९

उमेदवारीची शाश्वती नसल्याने भालकेंचा भाजपा प्रवेश रखडला! आ.भारत भालके यांना भाजपात परिचारक यांचा तर सेनेत शैला गोडसे यांचा अडथळा


                                              मंगळवेढा(प्रतिनिधी )पंढरपूर-मंगळवेढा विधानसभाचे सदस्य आ.भारत भालके हे गेल्या अनेक दिवसापासून युतीच्या वाटेवर आहेत.मात्र युतीच्या नेत्यांकडुन आ.भारत भालकेंना पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील पक्षीय उमेदवारीचीच शाश्वती मिळेनासी झाली आहे.त्यामुळेच त्यांचा महायुतीचा प्रवेश रखडला असल्याचे बोलले जात आहे. आ.भारत भालकेचे युतीच्या उमेदवारीसाठी अद्यापही प्रयत्न सुरू आहेत.मात्र उमेदवारी मिळालीच नाही तर आ.भारत भालके युतीतील काही वरिष्ठ नेत्यांच्या सुचनेनुसार अपक्ष उभारण्याच्या तयारीत आहेत.                     आ.भारत भालके हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबतच भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा होती.मात्र तसे काही झाले नाही.आषाढी यात्रेवेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कॉग्रेसचे आ.भारत भालकेच्या घरी पाहुणचार घेतला.यानंतर सर्वार्थाने भालके हे कॉग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचे संकेत मिळत गेले. त्यानंतर देखील मुंबईत कॉग्रेस  शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्रयाच्या भेटीला आ.भालके हे गैरहजर राहिले आणि साहजिकच ते युती प्रवेशासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जाऊ लागले. यामध्ये आता गेल्या पंधरा दिवसापासून मुंबईच्या वा-यां करून भाजपा अथवा सेना प्रवेशासाठी भालकेंनी मोठे प्रयत्न केले आहेत. मात्र सेना तसे भाजपाकडुन उमेदवारीची कुठलीच शाश्वती भालकेंना मिळत नसल्याचे सुत्रांची माहिती आहे. त्यामुळेच आ.भारत भालके यांचा युती प्रवेश रखडला असल्याचे बोलले जात आहे. उद्या सोलापुरात अनेक नेत्यांचे भाजपा प्रवेश होणार आहेत.जर आ.भारत भालके यांना काही ठोस आश्वासन मिळेल तर ते नक्कीच भाजपाच्या कळपात जातील असे ही वर्तविले जात आहे. आ.भारत भालके सारख्या अट्टल मुरब्बी  राजकारण्या पैलवानाला सध्या युतीचे दरवाजे उमेदवारीसाठी बंद का होत आहेत.याचा जर मागोवा घेतला तर निश्चितच हा विषय त्यांच्या कारखान्यातील व्यवहारापर्यंत जाऊन पोहोचतो.तसेच गेल्या चार वर्षात फडणवीस सरकारविरुद्ध देखील सारखे सारखे आग ओखण्यात अग्रेसर होते.तसेच स्थानिक विरोधक असणाऱ्या आ.परिचारकांची देखिल मोठी अडचण त्यांच्या प्रवेशात होत आहे.या सर्व गोष्टीच्या विचारानेच आ.भालकेंना युतीकडुन उमेदवारीची शाश्वती मिळत नाही. आ.भारत यांच्या प्रवेश असाच जर रखडत राहीला तर ऐनवेळी आ.भारत भालके हे संपूर्णपणे पक्षीय राजकारण बाजूला ठेवतील आणि अपक्ष निवडणूक लढवतील आणि जनतेने कौल दिला तर आमदारकीची हॕट्रिक साधतील असा मतदारसंघातील जाणकारांचा अंदाज आहे.
test banner