मंगळवेढा प्रतिनिधी:-
श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालयातील शास्त्र विभागाचा वैष्णव शिवाजी कांबळे याने MHT-CET परीक्षेत PCM ग्रुपमध्ये 97.63 पर्सेंटाईल गुण मिळवून दैदिप्यमान यश मिळवत मुलामध्ये मंगळवेढा तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला.
सदर यशाबद्द्दल महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. औदुंबर जाधव व उपप्राचार्य प्रा.राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा.गायकवाड म्हणाले खरंतर शाहू महाराज जयंती निमित्त वैष्णवचा सत्कार करताना खूपच आनंद झाला असुन आरक्षणावर व आपल्या गुणवत्तेवर वैष्णवने खुप मोठे होऊन महाविद्यालयाचे नाव मोठे करावे असे सांगून शुभेच्छा दिल्या तर प्राचार्य जाधव म्हणाले वैष्णव आणि त्याच्या वडिलांनी महाविद्यालयावर जो विश्वास ठेवून प्रवेश घेतला होता त्याचे आज खरोखरचं सार्थक झाले आहे.मिळालेल्या यशाने हुरळून न जाता यशाच्या शिखरावर जावे असे सांगून शुभेच्छा दिल्या.
यावेळी वडील शिवाजी कांबळे यांनी महाविद्यालयाच्या सर्व शिक्षकांचे आभार मानले.
यावेळी सर्व शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते वैष्णवच्या यशाबद्दल संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. विनायक कलुबर्मे यांनी केले.