वारी परिवार सायकल क्लबच्या वतीने फिट इंडिया संडेज ऑन सायकल उपक्रमाचे आयोजन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, २९ जून, २०२५

वारी परिवार सायकल क्लबच्या वतीने फिट इंडिया संडेज ऑन सायकल उपक्रमाचे आयोजन.


मंगळवेढा:-

भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने सुरू केलल्या फिट इंडिया संडेज ऑन सायकल उपक्रमाअंतर्गत मंगळवेढ्यातील वारी परिवार सायकल क्लबच्या वतीने मंगळवेढा-एकलासपूर-अनवली-मुंढेवाडी अजनसोंड-देगाव-मंगळवेढा 54 किलोमीटरची सायकल राईड काढून फिटनेस चळवळीस चालना दिली आहे. 


सदर उपक्रमातून सायकल चालवण्याला शाश्वत,सर्वसमावेशक आणि अनेक आरोग्य लाभांसह पर्यावरणपूरक व्यायाम म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी वारी परिवार सायकल क्लब सतत प्रयत्नशील आहे.


भारताच्या माननीय पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असा ज्यामध्ये फिटनेस जागरूकता वाढवण्यावर आणि सायकलिंगला निरोगी आणि पर्यावरणपूरक वाहतुकीचे साधन म्हणून प्रोत्साहित करण्यावर लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त लोकांनी सायकलीचा वापर करावा तसेच फिटनेस का डोस आधा घंटा रोज म्हणजेच दररोज किमान तीस मिनिटे सायकलिंग करावी आणि समग्र आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण होण्यासाठी सदर राईडचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी देगाव येथील निसर्गरम्य असणाऱ्या श्री संध्यावळी देवी मंदिराला भेट देऊन देवीची आरती करण्यात आली.


यावेळी घाटावरती डॉ.राहुल शेजाळ यांनी प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मेडिटेशनचे खूपच महत्व आहे असे सांगून प्रात्यक्षिक करण्यात आले.


फिटनेसबद्दलची जागरुकता निर्माण होण्यासाठी आयोजित केलेल्या राईड मध्ये क्लबचे अध्यक्ष स्वप्निल टेकाळे,शिवन्या कलुबर्मे,नंदकुमार नागणे,प्रफुल्ल सोमदळे,सिद्धेश्वर डोंगरे,डॉ राहुल शेजाळ,प्रा महेश अलिगावे,सतिश भाऊ दत्तू,कमलेश माळी,अविराज जाधव,भारत नागणे,फारुख मुजावर,चंद्रजीत शहा,विजय क्षीरसागर,प्रा विनायक कलुबर्मे आदीजण सहभागी होते.


test banner