मंगळवेढा:-
महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर नगरीत संपन्न झालेल्या चतुर्थ अखिल महाराष्ट्र सायकल वारी व संमेलनात मंगळवेढ्याच्या वारी परिवार सायकल क्लबने पर्यावरण रक्षणाचा संदेश देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सुरवातीस सायकल वारीचे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे,पालकमंत्री जयकुमार गोरे,आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील,खा धैर्यशील मोहिते-पाटील,उमेश परिचारक यांच्या हस्ते उदघाटन झाले.
यावेळी नगर प्रदक्षिणा मार्गावर विठू नामाच्या गजराने पंढरपूर नगरी दुमदुमली होती यावेळी वारी परिवार सायकल क्लबच्या वतीने सायकल चालवा इंधन वाचवा,झाडे लावा झाडे जगवा,चला चला झाडे लावू चला असा जागर घालीत जगात भारी सायकल वारी असा नारा देण्यात आला तसेच रेल्वे मैदानावर झालेल्या सायकल रिंगण सोहळ्यात क्लबचे सदस्य देहभान विसरून सर्वजण भक्तीरसात न्हाऊन निघाले तर सायकल संमेलनात वारी परिवार सायकल क्लबचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
आरोग्य,पर्यावरण व अध्यात्म या त्रिवेणी संगमातून संपन्न झालेल्या सायकल वारीत 98 सायकल क्लबचे महाराष्ट्रातून तब्बल साडे चार हजार सायकल पट्टू वारीत सहभागी झाले होते.
सदर सायकल संमेलन यशस्वी पंढरपूर सायकल्स क्लब, नाशिक सायक्लिस्ट,बारामती सायकल क्लब आणि लातूर सायक्लिस्ट क्लब कडून विशेष परिश्रम घेण्यात आले.
यावेळी क्लबचे अध्यक्ष स्वप्निल टेकाळे,आदित्री गुंगे,शिवन्या कलुबर्मे,जयंत पवार,चंद्रजीत शहा,प्रा. महेश अलिगावे,शुभम टेकाळे,प्रफुल्ल सोमदळे,राहुल बनसोडे,सिद्धेश्वर डोंगरे,फारुख मुजावर पांडुरंग नागणे,गणेश मोरे,भारत नागणे,पांडुरंग कौडूभैरी,डॉ.राहुल शेजाळ,विष्णू भोसले,विजय क्षीरसागर,शरद हेंबाडे ,यश महामुनी,प्रमोद महामुनी,अवी जाधव,अरुण गुंगे,नंदकुमार नागणे समर्थ महामुनी,राजेश माळी,संदेश माळी परमेश्वर पाटील,नाना भगरे,नागेश डोंगरे,आकाश साबळे,चंद्रकांत चेळेकर,रविराज जाधव,मोहनराव जुदळे,नानासाहेब कौडूभैरी,प्रा विक्रम पवार,प्रा.विनायक कलुबर्मे,सतिश दत्तू आदी सदस्य उपस्थित होते.