सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने राज्याभिषेक दिन साजरा. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, ७ जून, २०२५

सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने राज्याभिषेक दिन साजरा.


मंगळवेढा:-

मंगळवेढा येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने शिव राज्याभिषेक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.


दिनांक 6 जून रोजी शिवालयात शिवमूर्तिवर दुग्धाधभिषेक व पुष्पवृष्टी करून पूजन करण्यात आले. यावेळी शिवजयंती उत्सव मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या लोगोचे व टी-शर्टचे अनावरण करण्यात आले.


यावेळी गाडीवरती लावण्यासाठी बनविलेले सुवर्ण महोत्सवी वर्षाचे स्टिकर सर्वांना वाटप करण्यात आले. यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.


test banner