ॲग्रीकॉस पुरस्काराने शेतकरी सन्मानीत . . . ! - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, ११ जून, २०२५

ॲग्रीकॉस पुरस्काराने शेतकरी सन्मानीत . . . !


सोलापूर ,ता . १० : 

ॲग्रीकॉस एस्पोर्टस प्रा . लि . कंपनीने सरकोली (ता . पंढरपूर ) येथे रविवारी (ता . ८ ) रोजी प्रयोगशील शेतकऱ्यांना पुरस्काराने सन्मानीत केले . काल सायंकाळचा तो क्षण, तो सोहळा, तो श्वास… हा केवळ पुरस्कार नव्हे… तर शेतकऱ्याच्या आत्म्याला जणू सलामीच दिली . 


यावेळी ॲग्रीकॉस पुरस्काराने सन्मानीत झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या गावात शेतीचे प्रगत तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत , असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष भगीरथ भालके यांनी केले . भिमा नदीच्या खोऱ्यात सुजलाम सुफलाम झालेल्या शेतकऱ्यांनी आता ॲग्रीकॉस तंत्रज्ञान वापरून उत्पादनात वाढ करावी असे मत उद्घाटक सचिन पाटील यांनी व्यक्त केले.


सायंकाळच्या झळाळत्या प्रकाशात… ‘ॲग्रीकॉस शेतकरी सन्मान कार्यक्रम’ सुरू झाला तो शेतकऱ्यांच्या प्रचंड उत्सहाने . सायंकाळचा मृदगंधी वारा मंदपणे वाहत होता… आकाशात सुर्यास्ताची लालसर-केशरी रंगछटा पसरत होती, जणू संपूर्ण सृष्टी आज या शेतकरी सन्मानासाठी सजली होती.


पार्श्वभूमीला पक्ष्यांची संथ गुंजन आणि ढगांच्या सावल्यांमधून झिरपत येणारा मऊ प्रकाश… हे दृश्य अगदी जादुई वाटत होतं. कार्यक्रमस्थळी एक वेगळंच समाधानाचं, अभिमानाचं आणि आदराचं वातावरण भरून राहिलं होतं. मंचावर मोजकं पण उठावदार सजावट – बाजूला ऊसाच्या आणि केळीच्या बागा वाऱ्याने डोलत होत्या .  शेतकरी बांधव आपल्या पारंपरिक पोशाखात, चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि डोळ्यांत चमक घेऊन एकत्र जमले होते.


संपूर्ण वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा, एक एकात्मता जाणवत होती – जणू हे केवळ कार्यक्रम नव्हे, तर एक चळवळ आहे.


कष्टकऱ्याला मान देणारी, त्याला प्रेरणा देणारी!

माईकवरून निवेदकाचा आवाज संथपणे घुमतो… "शेतकऱ्याच्या हातात धरलेली मशाल आज गौरवाने सजते आहे…" टाळ्यांच्या गजरात एक एक शेतकरी मंचावर येत त्याच्या हातात ट्रॉफी, सन्मानपत्र, गळ्यात मेडल  आणि डोळ्यांत थोडी नम्रता, थोडा अभिमान… पण मनात एकच भावना – "माझाही शेतीतील प्रयोग  कुणीतरी पाहतयं . . . !" सायंकाळचा तो क्षण, तो सोहळा, तो श्वास… हा केवळ पुरस्कार नव्हे… ही आहे शेतकऱ्याच्या आत्म्याला दिलेली सलामी.


यावेळी व्यासपिठावर सचिन पाटील, दत्तात्रय भोसले, हनुमंत भोसले, पंजाबराव भोसले,  हरिदास भोसले, रमेश भोसले, पांडुरंग भोसले, पंडित दिघे, अशोक भोसले,  ब्रह्मपुरीचे सरपंच विजयसिंह पाटील, राया पतसंस्थेचे संचालक तानाजी गोडसे, प्रियांका डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते . श्री . भालके म्हणाले , भीमा नदीच्या पाण्यामुळे ऊस व केळीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे . मात्र ऊस व केळी पिकाचे एकरी उत्पादन घटत चालले आहे . अशा परिस्थितीत जर का आपण केळी व ऊस पिकाचे एकरी उत्पादन वाढवले तर शेतकऱ्यांची अजून चांगली भरभराट होईल . ॲग्रीकॉस कंपनीचे टेक्निकल डायरेक्टर अजय आदाटे यांनी आपल्या चर्चासत्रातून शेतकऱ्यांना शेतमालाचे उत्पादन वाढीसाठी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करावा . त्याच्या जोडीने ॲग्रीकॉस तंत्रज्ञान वापरले तर केळी व ऊस पिकाचे उत्पादन वाढीस चांगली मदत होणार असल्याचे सांगितले . कट्टे उद्योग समुहाचे संजय कट्टे यांनी ईडा पिडा जावू दे आणि बळीचं राज्य येऊ दे ही म्हण मी लहान पनापासून ऐकतोय . मात्र बळीच राज्य अध्याप तरी आले नाही . म्हणून शेतकऱ्यांनी शेती परवडण्यासारखी करावी . त्यासाठी नवीन तंत्रज्ञान शिकून घेण्याचे अवाहन केले . 

- -

कार्यक्रमाची सुरूवात लहान मुलांना देशी केळीच्या रोपाची भेट देऊन केली .


यांना मिळाला पुरस्कार :  अॅग्रीकॉस पुरस्कार २०२५


श्री. संग्रामसिंह भालके, सरकोली


श्री. श्रीनिवास बनसोडे, चळे


श्री. दत्ता (दाजी) गायकवाड, चळे


श्री. भैय्या पाटील, कोंढारकी


श्री. प्रभाकर नागनाथ राजमाने, आंबे चिं.


श्री. महादेव शिंदे, आंबे


श्री. बसवंत पाटील, धर्मगांव


श्री. समाधान जाधव, ओझेवाडी


श्री. संजय पावले, धर्मगांव


श्री. कैलास व्हनमाने, पुळूज


श्री. विठ्ठल श्रावण साखरे, उचेठान


श्री. सुरज धनंजय पाटील, ब्रम्हपुरी


श्री. समाधान भोसले, सरकोली


श्री. विठ्ठल फडतरे, सरकोली


एस. के. छाटणी एक्सपर्ट ग्रुप, धर्मगांव


हरिभाऊ यादव, मारापुर


स्वाती काळे, सुपली


या वेळी सरकोली गावाचे सरपंच शिवाजी भोसले, उपसरपंच भास्कर भोसले, प्रगतशील बागायतदार सुरेश अप्पा भालके,  संतोष भोसले आणि पंचक्रोशीतील सर्व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सूत्रसंचालन संतोष मिसाळ यांनी केले तर ॲग्रीकॉसचे मॅनेजिंग डायरेक्टर शहाजी घाडगे यांनी सर्वांचे आभार मानले.


test banner