मंगळवेढा:-
संत शिरोमणी चोखोबाराय यांच्या 687 व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त दिनांक 15 मे ते 17 मे 2025 या कालावधीत मंगळवेढ्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे समाधी मंदिर समितीचे अध्यक्ष जयराज शेंबडे यांनी सांगितले.
गुरुवार दिनांक 15 मे रोजी सकाळी 9 वाजता संत दामाजी मंदिर ते संत चोखामेळा समाधी मंदिरापर्यंत दिंडी प्रदक्षिणा काढली जाणार असून सकाळी 10 वाजता सदगुरु समर्थ दाजी महाराज, तनाळी मठ यांच्या हस्ते विणा पूजन करण्यात येणार आहे.
सकाळी 10.30 कोल्हापूर नाईट कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.अरुण शिंदे व दामाजी ट्रस्टचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे यांच्या हस्ते संत चोखोबा समाधी मंदिराची वेबसाईट व स्मरणिका प्रकाशन सोहळा संपन्न होणार असून सकाळी 11 ते सायं 7 पर्यंत संगीत भजन होणार आहे रात्री 8 वाजता सोंगी भारूडाचे उदघाटन उद्योजक वैभव नागणे,अनिल सावंत व अजित जगताप यांच्या हस्ते होणार असून यावेळी भारूडकार ह.भ.प. महादेव महाराज शेंडे,पिसेवाडी यांचे सोंगी भारूड सादर होणार आहे.
शुक्रवार दिनांक 16 मे रोजी सकाळी 11 ते सायं 6 पर्यंत सामूहिक संगीत भजन होणार असून सायं 6 वाजता डॉ.प्रणिती भालके,अरुणाताई माळी व मुख्याधिकारी चरणकुमार कोल्हे यांच्या हस्ते सामाजिक उपक्रमा अंतर्गत मंगळवेढा नगरपालिकेतील रोजंदारीवर काम करणाऱ्या झाडू कामगार महिलांना भांडी संच दान करण्यात येणार आहेत.
रात्री 8 वाजता किर्तनाचे उदघाटन प्रा.शिवाजीराव काळुंगे,शिवानंद पाटील शशिकांत चव्हाण यांच्या हस्ते होणार असून ह.भ.प.सतिश महाराज कदम आष्टा,ता.भूम उपस्थित राहणार आहेत.
शनिवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 8 वाजता आमदार समाधान आवताडे,आमदार अभिजित पाटील व प्रशांत परिचारक यांच्या हस्ते पुण्यतिथी निमित्त संत चोखोबाराय यांच्या समाधीस महाअभिषेक होणार असून सकाळी 11 वाजता संत नामदेव महाराजांचे सोळावे वंशज हभप निवृत्ती महाराज नामदास,पंढरपूर यांचे काल्याचे किर्तन होणार असून दुपारी 12 वाजता पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे तर दुपारी 1 वाजता दलित मित्र स्व.बाबासाहेब धुळा साळे यांच्या स्मरणार्थ संत चोखोबा शिक्षण प्रसारक मंडळ हुन्नूर या संस्थेचे प्रमुख प्रशांत पुंडलिक साळे यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार असून पुण्यतिथीची समाप्ती होणार आहे.
तरी सर्व भक्तगणांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री संत चोखामेळा मंदिर समिती,वारी परिवार व अखिल भाविक वारकरी मंडळांच्या वतीने करण्यात आले आहे.