मंगळवेढ्यात संभाजी महाराज जयंतीनिमित्त मूर्तीप्रतिष्ठाना व शाहिरी बाणा. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, १२ मे, २०२५

मंगळवेढ्यात संभाजी महाराज जयंतीनिमित्त मूर्तीप्रतिष्ठाना व शाहिरी बाणा.


मंगळवेढा:-

मंगळवेढा येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने बुधवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 9 वाजता चोखामेळा चौकातील मारुतीच्या पटांगणात आमदार समाधान आवताडे व प्रशांत परिचारक यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असून यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड व पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे उपस्थित राहणार आहेत.


तर सायंकाळी 7.30 छत्रपती संभाजी महारांजांच्या पराक्रमाची व बलिदानाची शौर्य गाथा सांगणारा शिवशाहीर राजेंद्र कांबळे खुडूसकर यांचा शाहिरीबाणा पोवाडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


कार्यक्रमाचे उदघाटन आमदार अभिजित पाटील व शिवाजीराव काळुंगे यांच्या हस्ते होणार असून यावेळी अनिल सावंत व भगीरथ भालके उपस्थित राहणार आहेत.


तरी सर्व शंभू भक्तांनी व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती सुवर्ण महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


test banner