मंगळवेढा:-
छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास व आदर्श हाच तरुणांना जगण्याचा खरा मंत्र आहे यासाठी मनी ध्यानी संभाजी महाराज आठवावे असे विचार सुप्रसिद्ध व्याख्याते शरद तांदळे यांनी व्यक्त केले ते मंगळवेढा येथे शंभू शाहू जयंती निमित्त खिलाडी ग्रुपच्या वतीने आयोजित केलेल्या छत्रपती संभाजी महाराज आणि आजचा तरुण या विषयावर व्याख्यान देताना बोलत होते.
सुरवातीस छत्रपती संभाजी महाराज मूर्तीचे पूजन आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते व प्रा.शिवाजीराव काळुंगे,लक्ष्मणराव ढोबळे,अभयसिंह मोहिते,राहुल ताड,अमर साळुंखे,रवी मोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी तांदळे म्हणाले अतिशय कमी वयात संभाजी महाराजांनी लिहलेली पुस्तके तरुणांनी वाचणे आवश्यक आहे.अनेक भाषेचे ज्ञान असणारा जगातील एकमेव राजा आहे नेहमी सकारात्मक विचार करून प्राप्त परिस्थितीला सामोरे कसे जायचे हे शंभूचरित्र आपल्याला शिकवते तरुणांनी शिवरायांना व संभाजी महाराजांना वारंवार आठवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
यावेळी खिलाडी ग्रुपचे सर्व सदस्य शिवशंभू प्रेमी नागरिक उपस्थित होते भारत मुढे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.