मंगळवेढा:-
नैतिकता आणि सात्विकतेच्या पाठबळावर सामर्थ्य दाखविणारे खरे संत म्हणजे संत शिरोमणी चोखामेळा आहेत असे प्रतिपादन डॉ. अरुण शिंदे यांनी व्यक्त केले ते मंगळवेढा येथे संत शिरोमणी चोखोबाराय यांच्या स्मृतिदिना निमित्त काढण्यात आलेल्या स्मरणिका प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.
सुरवातीस संत चोखामेळा समाधीचे पूजन करण्यात आले यावेळी संत चोखामेळा यांचे विचार जगभरात पोहचण्यासाठी समाधी मंदिराच्या वेबसाईटचे उदघाटन दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे यांच्या हस्ते तर माणुसकीचा मळा भक्तीचा लळा संत चोखामेळा या स्मरणिकेचे प्रकाशन रत्नाप्पा नाईट कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख डॉ.अरुण शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी डॉ.शिंदे म्हणाले स्मरणिकेच्या रूपाने संत चोखोबारायांच्या विचाराचे अक्षरधन हाती पडणार असून वाचेल तो विजयी होईल असे सांगितले आपल्या निस्सीम भक्तीवर देवालाही परखडपणे प्रश्न विचारून त्या काळातील पहिले बंड करणारे हे वारकरी सांप्रदायातील पहिले संत आहेत वंचितांचे जगणे नशिबात येऊनही भावभक्तीचा झरा हृदयात कायम वाहता ठेवणाऱ्या संत चोखोबाचे संपूर्ण कुटुंब विठ्ठल भक्त होते गुरुविना कोण दाखवील वाट या मताप्रमाणे गुरू परंपरेला वारकरी पंथात अतिशय महत्त्व असून आपल्याला हा भक्तीचा मार्ग ज्याच्यामुळे चालत आला त्या संत नामदेवांना चोखोबांनी गुरुस्थानी मानले यासाठी संताचे विचार समजून घेण्यासाठी नवीन पिढीने संत साहित्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे असे सांगून मंदिर समिती व वारी परिवाराच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी स्मरणिकेसाठी मोलाचे योगदान देणारे जयदीप रत्नपारखी,प्रवीण खवतोडे,गौरीशंकर बुरकूल,सागर डांगे,संदीप जाधव,श्रीकांत काटे,बाबुराव राजमाने,नामदेव शिंदे,प्रशांत गडकर,रामेश्वर वठारे,रविंद्र शेंबडे,प्रविण उगाडे,निखिल राजमाने,विठ्ठल सरवदे,अभिजित शिंदे,सतिश दत्तू,आक्रम मुल्ला आदिंना मंदिर समितीच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी ह.भ.प.दाजी महाराज,जयराज शेंबडे,पठाण शिवशरण,अरुण शिवशरण नागेश डोंगरे बाळकृष्ण महाराज,संतोष दत्तू,राजाभाऊ गणेशकर,शरद गोवे,अरुण गुंगे,गणेश यादव,मनोज माळी,अजय आदाटे,सचिन चव्हाण,रतिलाल दत्तू,माऊली डांगे,प्रफुल्ल सोमदळे,हरी ताम्हणकर यांचेसह अनेक वैष्णव भक्त उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंद्रजीत घुले यांनी तर सूत्रसंचालन प्रा.विनायक कलुबर्मे यांनी करून आभार मानले.