मंगळवेढा येथे संत चोखामेळा यांची 687 वी पुण्यतिथी साजरी. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, १७ मे, २०२५

मंगळवेढा येथे संत चोखामेळा यांची 687 वी पुण्यतिथी साजरी.


मंगळवेढा:-

आपल्या अवीट भक्तीच्या बळावर परमात्मा विठ्ठलाच्या हृदयात स्थान निर्माण करणारे संत परंपरेतील संत चोखामेळा हे अग्रगण्य संत आहेत असे मत संत नामदेव महाराजांचे सोळावे वंशज ह.भ.प. माधव महाराज नामदास यांनी व्यक्त केले.


यावेळी चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास असे भक्तांचिये घरी काम न सांगता करी अनाथाचा बंधू अंगी असे हा संबंधु तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे या अभंगावर मंगळवेढ्यात मोठया भक्तीभावात आयोजित केलेल्या काल्याच्या किर्तनात ते बोलत होते.


स्मृतिदिनानिमित्त आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते समाधीवर महाअभिषेक करून पूजन करण्यात आले यावेळी प्रा.लक्ष्मणराव ढोबळे,राहुल शहा,शशिकांत चव्हाण,अजित जगताप, चंद्रशेखर कोंडूभैरी,धनाजी खवतोडे,श्रीशैल्य राजमाने,यतिराज मर्दा,मुझ्झपर काझी,दिगंबर यादव,नागेश डोंगरे,सुदर्शन यादव,भिमराव मोरे,सुनील रंदवे,मुन्ना मुलाणी,बबलू सुतार,आबू सुतार,सुशांत हजारे यांचे सह अनेक भक्तगण उपस्थित होते. 


यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी संत भूमीत प्रतीक्षेत असलेले संत चोखामेळा यांचे स्मारक लवकरच पूर्णत्वास जाईल असे सांगून विनम्र अभिवादन केले तर माधव महाराज नामदास यावेळी संत चोखोबाचा समाधी सोहळा साजरा करणे म्हणजे संत चोखोबासारखी भक्ती आपल्या करता आली पाहिजे हे शिकणे आहे देवाच्या दारात न्याय मिळाला नसला तरी आपल्या कर्मरूपी भक्तीच्या बळावर चोखोबा अजरामर झाले असे सांगून संताच्या चरणस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे म्हणूनच मंगळवेढे भूमी संतांची ओळखली जाते.


यावेळी समाधी स्थळावरती पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी स्व. बाबासाहेब धुळा साळे यांच्या स्मरणार्थ संत चोखोबा शिक्षण प्रसारक मंडळ हुन्नूर प्रशांत पुंडलिक साळे यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करून सोहळ्याची सांगता करण्यात आली. 


यावेळी मंदिर समितीचे जयराज शेंबडे,पठाण शिवशरण,अरुण शिवशरण,ज्ञानेश्वर भगरे,मस्तान मुल्ला,माऊली डांगे,सचिन यादव,दिलावर मुजावर,रितेश मोरे यांचेसह वारी परिवाराचे सर्व सदस्य,संत चोखोबा शिक्षण प्रसारक मंडळातील सर्व शिक्षक शिक्षिका,अखिल भाविक वारकरी मंडळाचे सर्व सदस्य,पत्रकार यांचेसह मोठया संख्येने वैष्णव भक्त महिला उपस्थित होते.


test banner