मंगळवेढा:-
मंगळवेढा येथील वारी परिवार या सामाजिक संस्थेच्या उल्लेखनीय कार्याबद्दल छत्रपती परिवार मरवडे यांचा समाज गौरव पुरस्कार वारी परिवाराचे अध्यक्ष सतिश दऱ्याप्पा दत्तू यांना प्रदान करण्यात आला.
छत्रपती परिवाराच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दिनांक 22 मार्च रोजी नंदकुमार पवार व इतर मान्यवरांच्या हस्ते सतिश दत्तू यांना सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
अनेक तरुणांना एकत्र करून प्रत्येक महिन्याच्या एकादशीला पंढरपूर जाणाऱ्या वारी परिवाराचे सामाजिक कार्य सुरु आहे.
ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो आहे त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो तसेच आपण आपल्या गावासाठी काही तरी करावे या भावनेतून दारू नको दूध प्या,वृक्षरोपण,माणुसकीची भिंत,मतदान जनजागृती सायकल रॅली,मारणोत्तर नेत्रदान,व्यसमुक्ती,सार्वजनिक शौचालायाची स्वच्छता,शैक्षणिक साहित्य वाटप,बेघर झालेल्या अनाथांना ब्लॅकेट वाटप,स्मशानभूमीतील महिलेचा सन्मान करून महिला दिन अशा अनेक क्षेत्रामध्ये वारी परिवाराने सामाजिक कार्याचा ठसा उमटवीला आहे आणि म्हणूनच अशा परिवाराचे अध्यक्ष सतिश दत्तू यांचा सन्मान करण्यात आला.
सदर पुरस्कार वितरणाप्रसंगी कुटूंबातील सर्व सदस्य तसेच वारी परिवाराचे सर्व सदस्य उपस्थित होते.सतिश दत्तू यांना समाज गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल परिवारातील सर्व सदस्यांनी अभिनंदन केले.