मंगळवेढा:-
डीकसळ येथे सर्व जाती-धर्माच्या युवकांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून आकर्षक असे शिवालय उभे केले आहे.
या शिवालयास सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ मंगळवेढा येथील सदस्यांनी भेट दिली सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून देहमंत्र घेण्यात आला.
यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष हर्षल डोरले म्हणाले डिकसळ येथील शिवालयासारखे मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये शिवालय उभे केले जावे त्यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ मंगळवेढा यांच्या वतीने केली जाईल तसेच महाराजांचा आदर्श घेऊन सर्व जाती-धर्माच्या लोकांनी मिळून गावाचा विकास साधावा असे मत त्यांनी मांडले.
यावेळी पोपट पडवळे ज्ञानेश्वर कोंडुभैरी,प्रकाश मुळीक यांनी आपले मनोगत व्यक्त केले सर्व उपस्थितांना संतविचार व शिवविचाराची पुस्तके वाटप करण्यात करण्यात आली.
यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळचे अध्यक्ष बाळासाहेब नागणे,संभाजी घुले,मदन पाटील,सतीश दत्तू,प्रफुल्ल सोमदळे, अजीत लांडे तसेच डिकसळ गावचे लक्ष्मीकांत शिंदे,राजाराम कोळी,सरपंच नवनाथ शिंदे,मनोहर शिंदे सर,लक्ष्मण शिंदे,दादा शिंदे,सोपान पाटील,संजय शिंदे,समीक्ष शिंदे,गोरख फुगारे,प्रकाश शिंदे,नितीन शिंदे,विठ्ठल शिंदे,योगेश शिंदे,दत्तात्रय शिंदे,अक्षय पाटील,बाळासाहेब शिंदे,कुंडलिक निळे,विशाल मागाडे,मोरसिद पवार उपस्थित होते.