मंगळवेढा:-
सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ मंगळवेढाच्या वतीने शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात अंतर्गत प्रत्येक मराठी माणसाने आपल्या घरामध्ये उत्साहात शिवजयंती साजरी करावी यासाठी 11 फेब्रुवारी रोजी आपल्या घरातील उपलब्ध असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती किंवा फोटोची प्रतिष्ठापना करावी,घरावरती भगवा ध्वज लावून पूजन करावे,दररोज सकाळी जिजाऊ वंदना व देह मंत्र म्हणावा तसेच सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या सर्व कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा.
बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी शिवजयंती रोजी घरासमोर रांगोळी काढून फुलांची आरास करावी व सायंकाळी घर दिव्यांनी उजळून टाकावे,घराचे अंगण सुशोभीत करावे,घरामध्ये गोडधोड पुरणपोळीचे जेवण करावे.
सर्वांनी नवीन कपडे परिधान करावीत.एकमेकांना पुस्तके भेट देऊन शिवजयंतीच्या शुभेच्छा द्याव्यात.शिवजयंतीच्या मिरवणूक मध्ये कुटुंबासमत सक्रिय सहभाग नोंदवावा.अशा माहितीची पत्रके सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने शहरांमध्ये प्रत्येक घरामध्ये जाऊन वाटप करण्यात आली यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.