मंगळवेढा:-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या संकल्पनेतूनच भारतीय राज्यघटना लिहण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना फार मोठी प्रेरणा मिळाली असे मत प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी व्यक्त केले ते सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या शिवमुर्तीची प्रतिष्ठापना करताना बोलत होते.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे उपस्थित होते.सुरवातीस शिवमुर्तीचे पूजन करून जिजाऊ वंदना व ध्येयमंत्राने जयघोष करण्यात आला.
यावेळी प्रा.काळुंगे म्हणाले मंडळाकडून नेहमीच शिवजयंती उत्सव साजरा करण्याची आदर्श परंपरा जोपासली जात आहे.चारशे वर्षानंतरही शिवचरित्र प्रत्येकाला जगण्याची दिशा दाखवीत आहे ही गोष्ट खूपच महत्वाची आहे असे सांगून अनेक ऐतिहासिक दाखले देत छत्रपतीचे विचार व्यक्त केले.
यावेळी आवताडे म्हणाले सर्व जातीधर्मातील लोकांना एकत्र करून स्वराज निर्माण करणारा या जगातील एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत शिवजयंती मंडळाच्या वतीने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमातून चांगले विचार पेरण्याचे कार्य सुरु असून समाजाचे प्रबोधन होत आहे ही खरी शिवजयंती आहे असे सांगुन सर्वाना शुभेच्छा दिल्या.
यावेळी गट विकास अधिकारी योगेश कदम यांनी एवढ्या मोठ्या स्वरूपात शिवजयंती साजरी होत असताना खूपच आनंद होत आहे असे सांगून मंडळाचे कौतुक केले.
यावेळी रामचंद्र वाकडे,सचिन वाघमारे,दिनेश सोनुने,धनंजय इंगोले यांचेसह सर्व जेष्ठ सल्लगार,माजी अध्यक्ष,पदाधिकारी,शिवभक्त उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष हर्षद डोरले यांनी केले तर सूत्रसंचालन भारत मुढे यांनी तर अध्यक्ष बाळासाहेब नागणे यांनी आभार मानले.