मंगळवेढा:-
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरती आधारित छावा चित्रपट रंगप्रभा टॉकीजमध्ये प्रदर्शित करण्यात आला.सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब नागणे व हर्षद डोरले यांच्या शुभहस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करून सिनेमा प्रदर्शित करण्यात आला.
ही कहाणी आहे छत्रपती संभाजी महाराजांची.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाण्यानंतर जेव्हा मुघलांच्या आकांक्षा वाढू लागल्या होत्या,तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या नापाक इराद्यांना यशस्वी होऊ दिलं नाही.
इथे कहाणी महत्त्वाची ठरते.त्यांची महानता,वीरता,कौशल्य महत्त्वाचं आहे.या सिनेमाच्या माध्यमातून आपल्या इतिहासाची ही गौरवगाथा देशविदेशात पोहोचेल.
कोट्यवधी लोकांना कळेल छत्रपती संभाजी महाराज कोण होते सदर कार्यक्रमाप्रसंगी रंगप्रभा टाॅकीजचे प्रमुख रामचंद्र दत्तू,वारी परिवाराचे अध्यक्ष सतीश दत्तू,शिवाजी नागणे,प्रशांत घुले,स्वप्निल टेकाळे,सुदर्शन ढगे,संतोष नागणे,यश दत्तू विजय दत्तू ,किरण दत्तू,सोनू हजारे उपस्थित होते.