मंगळवेढा:-
शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मंगळवेढा येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तिसऱ्या पुष्पातून आज सायं 7.30 वाजता युवा शाहिर अविष्कार देशिंगे कवठेमहाकाळ जि.सांगली हे पोवाडा व स्फूर्तीगीतातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची व पराक्रमाची गाथा सादर करणार आहेत.
सदर पोवाड्याचे उदघाटन सिमाताई परिचारक यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी डॉ.प्रणिताताई भालके उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सुनंदा आवताडे,शोभाताई काळुंगे,श्रीमती भगिरथी नागणे,निलताई आटकळे,आशाताई नागणे,डॉ.प्रिती शिर्के,सब्जपरी मकानदार,अरुणाताई दत्तू,अरुणाताई माळी,तेजस्विनी कदम,सुनीता सावंत,डॉ.आसावरी घोडके,संगिता कट्टे,रतनताई पडवळे,राखीताई कोंडूभैरी,राजश्री टाकणे,सुप्रिया जगताप,डॉ पुष्पाजंली शिंदे,विशाखा खवतोडे,निर्मलाताई माने,ऍड कुमुदिनी घुले,अनिता नागणे,उषादेवी सारडा,सिमाताई बुरजे आदी महिला भगिनी उपस्थिती राहणार आहेत.
तरी कार्यक्रमास सर्व नागरिक व शिवभक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब नागणे व हर्षद डोरले यांनी केले आहे.