मंगळवेढा:-
जीवनात जो कोणी दुःखाच्या छताडावर आनंदाचं घर बांधतो आणि मेल्यावरही लोकांच्या हृदयात नांदतो तोच खरा माणूस असतो असे विचार प्रसिद्ध कवी व गझलकार अनंत विठ्ठल राऊत यांनी व्यक्त केले ते मंगळवेढा येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात काव्यमय समाज प्रबोधनातून कविता सादर करताना बोलत होते.
कार्यक्रमाचे उदघाटन दामाजी शुगरचे संचालक सिद्धेश्वर आवताडे यांच्या हस्ते संपन्न झाले आज तरूणांच्या गळ्यातील ताईत बनलेलं आणि महाराष्ट्राच्या साहित्य विश्वात घोंघावत असणारं अनंत राऊत यांच्या कवितेचे वादळ मंगळवेढ्यातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या काव्यपीठावरती येऊन स्थिरावले.
यावेळी कवी राऊत यांनी माझ्या राजाने उघडले नवसमतेचे दार,त्यांच्याच लेखणीतून झिरपलेली व मित्राचे नाते घट्ट करणारी दुःख अडवायला उंबऱ्यासारखा,मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा,वर्तमान परिस्थीतीवर परखड भाष्य करणारी भोंगा वाजलाय किँवा जी कविता ऐकून आई वडिलांना काही लोकांनी वृद्धाश्रमातून घरी आणलं ती मायबाप कविता असेल अशा त्याच्या अनेक कविता त्यांचे शब्द मनोरंजनच नाही तर प्रबोधन आणि परीवर्तन करत ऊर्जा देत मराठी साहित्य विश्वात सगळ्यात जास्त लोकोत्तर लोकप्रिय झालेल्या कविता सादर केल्या.
यावेळी शिरोळचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव,प्रविण खवतोडे विनोद राऊत,विक्रम सावंजी,महेश दत्तू,इंद्रजीत घुले,नरेंद्र खांडेकर,राहुल सावंजी,नितीन इंगळे,विनायक दत्तू,बबलू सुतार,प्रकाश मुळीक,सागर बेंगलोरकर,नागेश भगरे,विक्रम भगरे, संजय माळी,मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब नागणे,हर्षद डोरले आदीजण उपस्थित होते उपस्थितांची मने जिकंली यावेळी सर्व महिला भगिनी,सर्व राजकीय पक्षाचे नेते,शिवभक्त,महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बालाजी शिंदे यांनी करून आभार मानले.