मंगळवेढा:-
शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मंगळवेढा येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या चौथ्या पुष्पातून आज सायं 7.30 वाजता सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत,अकोला यांचा काव्यमय समाज प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
दुःख अडवायला उंबऱ्यासारखा,मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा या लोकप्रिय कवितेबरोबर अनेक सामाजिक काव्याचा अविष्कार सादर होणार आहे.
कार्यक्रमाचे उदघाटन माढा विधानसभा मतदार संघांचे आमदार अभिजित आबा पाटील यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी दामाजी शुगरचे संचालक सिद्धेश्वर आवताडे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी ॲड नंदकुमार पवार,प्रविण खवतोडे,सोमनाथ बुरजे,बशीर बागवान,अनिल इंगवले,विनोद राऊत,सोमनाथ शिंदे,चंद्रकांत घुले,विक्रम सावंजी,महेश दत्तू,इंद्रजीत घुले,नरेंद्र खांडेकर,अनिल दत्तू,अर्जुन बाबर,राहुल सावंजी,नितीन इंगळे,विनायक दत्तू,बबलू सुतार,प्रकाश मुळीक,बाळासो सावंत, विजय जावळे,संकेत खटके,सागर बेंगलोरकर,नागेश भगरे,विक्रम भगरे, अमोल केदार,अजीम मकानदार,संजय माळी,अशोक कोळी,बबलू शिंदे, विजयराज कलुबर्मे उपस्थिती राहणार आहेत.
तरी कार्यक्रमास सर्व नागरिक, काव्य रसिक व शिवभक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब नागणे व हर्षद डोरले यांनी केले आहे.


