शिवरायांचा आदर्श असताना तरुण पिढी डिप्रेशन मध्ये कशी ? :- निलेश चव्हाण. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२५

शिवरायांचा आदर्श असताना तरुण पिढी डिप्रेशन मध्ये कशी ? :- निलेश चव्हाण.


मंगळवेढा:-

छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास व आदर्श आपल्या समोर असताना आजची तरुण पिढी एवढी डिप्रेशन मध्ये कशी ? हा प्रश्न उपस्थित करीत यासाठी मनी ध्यानी शिवराय आठवावे असे विचार सुप्रसिद्ध व्याख्याते निलेश चव्हाण यांनी व्यक्त केले ते मंगळवेढा येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात शिवरायांना का आठवावे ? या विषयावर व्याख्यान देताना बोलत होते.


कार्यक्रमाचे उदघाटन माजी पालकमंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते तर भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक अनिलदादा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.


यावेळी चव्हाण म्हणाले शून्यातून विश्व निर्माण करता येते हे शिवरायांनी दाखवून दिले २३ किल्ले औरंगजेबाला द्यावे लागले तेव्हा खचून न जाता जिद्दीने शिवराय उभे राहिले आणि पुन्हा ते किल्ले शिवरायांनी परत मिळवले हे सर्व माहीत असताना आणि आपण स्वतःला त्यांचे मावळे म्हणवून घेत असताना इथले तरुण नैराश्याच्या भावनेने जर त्रस्त होत असतील कसे तर त्याचा अर्थ शिवचरित्राचा ध्यास आम्ही घेतला नाही म्हणून आमच्यात विश्वास निर्माण झाला नाही असेच म्हणावे लागेल म्हणूनच शिवरायांना वारंवार आठवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.


शिवरायांनी आपल्या आईवडिलांचे स्वप्न साकार केले एवढेच नाही तर स्त्रियांचा नेहमी आदर सन्मान केला म्हणून जिजाऊना सुद्धा आपल्या पुत्राचा अभिमान वाटला शिवरायांचे सामाजिक आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्य यात तुम्हाला काही फरक करता येत नाही म्हणून शत्रूनेही त्यांचे मोठेपण मान्यच केले.


शिवरायांना आठवत असताना स्त्रियांचा सन्मान करणे आणि आईवडिलांच्या स्वप्नासाठी मेहनत करणे कष्ट करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले यशाला शॉर्टकट नसतो त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते हे शिवचरित्र आपल्याला वारंवार शिकवते आहे ध्यास आणि अभ्यास व्यवस्थित असेल तर असाध्य वाटणाऱ्या गोष्टीही साध्य करता येतात हे शिवचरित्रातून आपल्याला दिसते असाध्य ते साध्य करिता सायास,कारण अभ्यास हा मंत्र शिवरायांकडे होतो म्हणूनच स्वराज उभा करता आले. 


छत्रपती शिवरायांसाठी लोक लढायला आणि मरायला ही सहज तयार झाले त्याचे कारण आम्ही नसलो तरी आमच्या माघारी आमच्या परिवाराला शिवराय वाऱ्यावर सोडणार नाही हा विश्वास मावळ्यांना होता म्हणून अडचणीच्या काळात मदतीचा हात आपल्यालाही पुढे करता आला पाहिजे यासाठी शिवरायांना आठवण्याची गरज आहे असे सांगून शिव विचारांचा जागर घालणाऱ्या सार्वजनिक शिवजयंती मंडळाचे कौतुक केले.


यावेळी महसूल सहाय्य्क,आरोग्य सेवक,कर सहाय्यक पदी निवड झालेल्या अंकुश निळे,दयानंद सोलनकर,सुरज उन्हाळे,दुवाबी मुलाणी-शेख,सागर सांगोलकर,भाऊसाहेब मोरे यांचा सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.


यावेळी चंद्रशेखर कोंडूभैरी,सचिन डोरले,दिंगबर भगरे,प्रा.डॉ.औदुंबर जाधव,ज्ञानेश्वर भगरे,प्रतिक किल्लेदार,संजय भुसे,जमीर इनामदार,आदिजण उपस्थित होते.


प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रशांत घुले यांनी केला तर संतोष मिसाळ यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.


test banner