मंगळवेढ्याची ज्वारीच्या कोठारा बरोबर अधिकाऱ्यांचे कोठार अशी ओळख व्हावी- प्रा.विनायक कलुबर्मे. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२५

मंगळवेढ्याची ज्वारीच्या कोठारा बरोबर अधिकाऱ्यांचे कोठार अशी ओळख व्हावी- प्रा.विनायक कलुबर्मे.


मंगळवेढा:-

मंगळवेढ्याची ज्वारीच्या कोठारा बरोबर अधिकाऱ्यांचे कोठार म्हणून भविष्यात ओळख निर्माण व्हावी असे मत प्रा.विनायक कलुबर्मे यांनी व्यक्त केले ते मंगळवेढा तालुका अधिकारी व कर्मचारी संघाच्या अभ्यासिकेमध्ये अंकुश निळे,दयानंद सोलनकर,सुरज उन्हाळे,दुवाबी मुलाणी-शेख,सागर सांगोलकर यांची महसूल सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल आयोजित केलेल्या सत्कार समारंभात बोलत होते.


अध्यक्षस्थानी वारी परिवाराचे अध्यक्ष सतिश दत्तू उपस्थित होते. सुरवातीस मंगळवेढ्याच्या अभ्यासिकेत रात्रंदिवस अभ्यास करून महसूल सहाय्यक पदी निवड झालेल्यांचा अभ्यासिकेच्या वतीने सन्मान करण्यात आला.


यावेळी प्रा.कलुबर्मे म्हणाले‌ स्पर्धा परीक्षा देत असताना अपयश आले तर खचून न जाता नव्या उमेदीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. पुस्तकांच्या सानिध्यात राहणारी माणसं ज्ञानाने फार श्रीमंत असतात आयुष्यामध्ये स्वप्न ठेवून खूप मोठे व्हा असे सांगून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.


यावेळी अंकुश निळे,दयानंद सोलनकर,सुरज उन्हाळे,दुवाबी मुलाणी-शेख,सागर सांगोलकर यांनी अभ्यासाची तयारी कशी केली व त्यातून यश कसे मिळवले याचे अनुभव सांगितले.


यावेळी जलाल मुलाणी,शब्बीर शेख यांचेसह विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अभ्यासिकेचे प्रमुख विलासराव आवताडे यांनी केले.


test banner