मंगळवेढा:-
मराठा सेवा संघ मंगळवेढा यांच्या वतीने आयोजित केलेल्या जिजाऊ जयंतीच्या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात धनश्री पतसंस्थेच्या चेअरमन शोभाताई काळुंगे म्हणाल्या जिजाऊ अत्यंत बुद्धिनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ होत्या जिजाऊ कधीच संकटसमयी डगमगल्या नाहीत,शिवरायांना यश मिळावे यासाठी यज्ञ,जप,तप,उपवास करीत बसल्या नाहीत.
यश मिळवण्यासाठी हाती तलवार घ्यावी लागते,चातुर्य पणाला लावावे लागते,प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते यावर जिजाऊंचा द्रुढ विश्वास होता.जिजाऊ प्रयत्नवादी होत्या.
शिवरायांवर चालून आलेल्या शत्रुचा नायनाट करण्यासाठी जिजाऊंनी मार्गदर्शन केले.जिजाऊ दैववादी नव्हे तर प्रयत्नवादी होत्या.त्यामुळे संकटसमयी त्या हताश–निराश झाल्या नाहीत.
आजच्या स्त्रीया मुलाचा गुणवत्ता यादीत क्रमांक यावा,नोकरी मिळावी,पदोन्नती मिळावी यासाठी यज्ञ,होमहवन,उपवास, नामस्मरण करताना दिसतात.जिजाऊंचा प्रयत्नवाद स्रियांनी आत्मसात केला पाहिजे.
यावेळी आशाताई नागणे,पल्लवी भोजने,रेश्मा गुंगे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाप्रसंगी विविध बँकेच्या चेअरमन राधाताई सुरवसे,सीमाताई भगरे,सुप्रिया जगताप,क्रांती दत्तू उपस्थित होत्या सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दया वाकडे व आभार भारती धनवे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवशंभो पतसंस्थेच्या चेअरमन तेजस्विनीताई कदम,सजग महिला पतसंस्था,श्रेयस टेलिकॉम,सह्याद्री ग्राफिक्स,अशोक मंडप मंडप यांचे सहकार्य लाभले यावेळी मराठा सेवा संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.