वारी परिवाराने रस्ता सुरक्षासाठी केले कारखान्यावरील ऊस वाहतूक चालकांचे प्रबोधन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, १२ जानेवारी, २०२५

वारी परिवाराने रस्ता सुरक्षासाठी केले कारखान्यावरील ऊस वाहतूक चालकांचे प्रबोधन.


मंगळवेढा:-

रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान अंतर्गत मंगळवेढा पोलीस स्टेशन व वारी परिवार यांच्या वतीने आयोजित केलेल्या मंगळवेढा ते संत दामाजी सहकारी साखर कारखान्यापर्यंत सायकल राईड काढून कारखाना स्थळावर ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी व ट्रॅक्टर चालकांचे रस्ता वाहतूक सुरक्षे संदर्भात प्रबोधन करण्यात आले.


पोलीस निरीक्षक महेशकुमार ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढ्याच्या वारी परिवार सायकल क्लबने रस्त्यावरील अपघात कमी व्हावेत तसेच ऊस वाहतूक करीत असताना कोणती काळजी घ्यावी यासाठी कारखाना स्थळावर जाऊन वाहन चालकांना पत्रके वाटण्यात आली.


सध्या ऊस वाहतुकीचे दिवस असल्यामुळे दामाजी कारखान्यावर रात्री,पहाटे बैलगाडीने व ट्रॅक्टरने ऊस वाहतूक मोठया प्रमाणावर सुरु आहे यामुळे ऊसाची ट्रॉली पलटी होऊन अनेक अपघात होत असतात यासाठी वाहतुकीचे नियम चालकांनी पाळावेत व रस्त्यावरचे होणारे अपघात टाळावेत,रस्ता सुरक्षेबाबत चालकांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने सदर राईडचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी ट्रॅक्टर चालवीताना मोबाईल वरती बोलू नका,कानामध्ये हेडफोन घालू नका,बैलगाडी वेगाने पळवू नका,ट्रॅक्टरमधील टेपचा आवाज मर्यादित ठेवा,मद्यप्राशन करून वाहन चालवू नये असा संदेश देऊन गतीला आवरा जीवाला सावरा,जो चुकला नियमाला तो मुकला जीवनाला,मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, वाहतुकीचे नियम पाळा रस्त्यावरचे अपघात टाळा,अती घाई संकटात न्हेई अशा घोषणा देऊन कारखाना परिसरात प्रबोधनाचा जागर घालण्यात आला.


तसेच रात्रीच्या वेळी पाठीमागील वाहणांना ऊसाची ट्रॉली दिसावी यासाठी मागील बाजूस रेट्रो रिफ्लेक्टिव्ह लावाण्यात आले.यावेळी कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले तर कार्यकारी संचालक जायभाय साहेब यांनी स्वागत केले.


याप्रसंगी ढवरे साहेब,दगडू फटे,लक्ष्मण बेदरे,गुंड साहेब,प्रकाश पाटील,रवी पाटील,कुमार मंडले,मुरलीधर हेंबाडे,तानाजी नकाते,प्रकाश बिराजदार,खंडू मंडले,दत्ता हेंबाडे,भास्कर शिंदे,जॅकी नागणे यांचेसह बैलगाडी व ट्रॅक्टर चालक मोठया संख्येने उपस्थित होते.


रस्ता सुरक्षा सायकल राईडमध्ये राजेंद्र नलवडे,सचिन घुले,योगीराज ठेंगिल,सुमित मुदगुल,राहुल बनसोडे,प्रकाश मुळीक,कृष्णा दत्तू,प्रफुल्ल सोमदळे,अरुण गुंगे,ओम नागणे,स्वप्नील टेकाळे,निखिल दत्तू,पांडुरंग कोंडूभैरी सिद्धेश्वर डोंगरे,भारत नागणे,यश महामुनी,रतिलाल दत्तू,चंद्रकांत चेळेकर,प्रा.विनायक कलुबर्मे,सतिश दत्तू सहभागी होते.




test banner