सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी बाळासाहेब नागणे व हर्षद डोरले यांची निवड. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, १९ जानेवारी, २०२५

सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी बाळासाहेब नागणे व हर्षद डोरले यांची निवड.



मंगळवेढा:-

मंगळवेढा येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाची वार्षिक बैठक रविवारी सकाळी १० वाजता लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय येथे पार पडली.


उपस्थित सर्वानुमते सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी बाळासाहेब नागणे व हर्षद डोरले यांची निवड एकमताने करण्यात आली.


४९ वा शिवजन्मोत्सव सोहळा सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून करण्यात येणार आहे.असे नूतन अध्यक्षांनी आपले मत व्यक्त केले यावेळी माजी अध्यक्ष,सल्लागार,पदाधिकारी व शिवभक्त बहुसंख्येने उपस्थित होते.



test banner