मंगळवेढा:-
मंगळवेढा येथील सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या वारी परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीने दिनांक २० डिसेंबर रोजी स्वच्छतेचे प्रणेते आणि अग्रदूत,थोर समाजसेवक संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त नर्मदा पार्क येथील स्व.बी.टी.पाटील जेष्ठ नागरिक संघ विरंगुळा केंद्राच्या परिसरातील सर्व पालापाचोळा गोळा करून सर्व झाडांच्या बुडात खत म्हणून टाकण्यात आला.
स्वच्छता मोहीम राबवून खऱ्या अर्थाने संत गाडगेबाबाचीं पुण्यतिथी विचारातून साजरी साजरी करण्यात आली.सुरवातीस गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला असे म्हणत ग्रामीण भागात स्वच्छतेचा नारा देऊन आपल्या कृतीतून प्रबोधन केले.
आज जरी गाडगे बाबा आपल्यामध्ये नसले तरी वारी पारिवाराच्या स्वच्छता दूतांनी गाडगेबाबांचे विचार जीवंत ठेवलेले आहेत मंगळवेढ्यातील विरंगुळा केंद्रात जेष्ठ नागरिकांचे अनेक कार्यक्रम होत असतात यामुळे वारी परिवाराच्या सफाई मोहीमेमुळे जेष्ठ नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे.
देव दगडात नसून देवाचा खरा अंश माणसात आहे यासाठीच गाडगेबाबांच्या विचाराला अनुसरून वारी परिवाराच्या स्वच्छता दुतांनी जेष्ठाचीं एक प्रकारची सेवाच केली आहे.
यावेळी जेष्ठ नागरिक संघाकडून दामोदर देशमुख यांनी संत गाडगेबाबांच्या अनेक आठवणी सांगत त्यांच्या कार्याचा आढावा घेतला तर दत्तात्रय जमदाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून संघाच्या वतीने वारी परिवाराचे आभार मानले.
मुख्याधिकारी चरणकुमार कोल्हे,दिलीप कोष्टी,पोपट महामुरे चंद्रकांत ढगे,चंद्रकांत ढवळे,तुकाराम अवताडे,श्रीमंत चव्हाण,ज्ञानेश्वर फुगारे,अशोक शिंदे,नामदेव पौळ,चांगदेव जाधव,सिध्देश्वर पट्टणशेट्टी,प्रकाश स्वामी,डी एन जाधव,अशोक शिंदे,वसंत गुंड,सुरेश धनवे,बाबा गवळी,नंदकुमार इंगळे,मंगल जाधव,जशवंती जमदाडे,आशा नागणे,सरस्वती क्षिरसागर,सुनंदा कलुबर्मे,प्रफुल्लता स्वामी,विजया सावंत,विजया देशमुख यांचेसह वारी परिवाराचे बाळासाहेब जावळे,चंद्रजीत शहा,प्रफुल्ल सोमदळे,सिद्धेश्वर डोंगरे,समीर गुंगे,अरुण गुंगे,प्रा.विनायक कलुबर्मे,सतीश दत्तू,प्रमोद महामुनी आदिजण उपस्थित होते.