मंगळवेढा येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने २० डिसेंबर रोजी शिवमुक्काम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले.
सायं ७ वाजता शिवालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सव मूर्तिचे पूजन सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष गणेशदादा सावंजी,अमित भोरकडे व प्रा.डॉ.राजकुमार पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी केलेली फुलांची आरास विशेष लक्ष वेधून घेणारी होती याप्रसंगी दीपोत्सव करून मिठाईचे वाटप करण्यात आले.दिनांक २० डिसेंबर १६६५ रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे मंगळवेढे येथे मुक्कामी होते.
यामुळे छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली मंगळवेढा नगरी म्हणून ओळखली जाते प्रत्येक वर्षी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या विविध उपक्रम राबवून शिवमुक्काम दिन साजरा करण्यात येत असतो सदर कार्यक्रमास सर्व माजी अध्यक्ष व शिवभक्त मोठया संख्येने उपस्थित होते.