मातोळी यात्रा निर्मल होण्यासाठी वारी परिवार सायकल क्लबची संदेश यात्रा. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, २३ डिसेंबर, २०२४

मातोळी यात्रा निर्मल होण्यासाठी वारी परिवार सायकल क्लबची संदेश यात्रा.


मंगळवेढा:-

मंगळवेढा तालुक्यातील (मातृलिंग) मातोळी यात्रा स्वच्छ,निर्मल व सुंदर होण्यासाठी वारी परिवार सायकल क्लबच्या वतीने बोरोळे,सिद्धापूर व मातोळी या गावात सायकलवरती जाऊन स्वच्छतेचा जागर घालीत संदेश यात्रा काढून प्रबोधन केले.


संक्राती नंतरचा दिवस म्हणजेच १५ जानेवारी २०२५ रोजी किक्रांत यादिवशी हजारो भाविक मातोळी येथे नदीच्या पात्रात भरणाऱ्या यात्रेसाठी व मातृलींग गणेशाचे दर्शन घेण्यासाठी एकत्र जमतात थंडी,वारा,ऊन,कशाचीही तमा न बाळगता भाविक या आनंद सोहळ्यात सहभागी होत असतात यामुळे अनेकजण आपले प्रातःविधी नदीकाठी वगैरे आटपून घेतात परिणामी याचा यात्रेवर व यात्रा झाल्यानंतर त्या गावावर विपरीत परिणाम होतो.


त्या गावातली अस्वच्छता,रोगराई वाढत असते यासाठी भक्तांनी शौचालयांचाच वापर करावा,प्लास्टिक पिशविचा वापर टाळावा,नदीचा व गावाचा परिसर स्वच्छ ठेवावा,नारळाची केसर व इतर निर्माल्य नदीच्या पाण्यात टाकू नये असे केले तरच भीमा नदीच्या तीरावर रांगोळ्या घातल्या जातील त्यामुळे आपोआप परिसर स्वच्छ होतो आणि त्या ठिकाणी कार्यकर्ते,गणेशभक्त बसून जेवू शकतील त्यामुळे यात्रेचा परिसर स्वच्छ होतो,तिथलं पावित्र्य जपलं जाईल आणि हीच खरी निर्मल मातोळी यात्रेची श्रीमंती आहे.


यासाठी वारी परिवाराच्या वतीने संदेशात्मक पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली.यावेळी मोतोळी येथे गणपतीची आरती करण्यात आली व बोराळे येथील ऐतिहासिक बसवेश्वर मंदिराला भेट देण्यात आली.


सर्व सायकलस्वारांचे बोराळे व सिद्धापूर ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले.यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब पाटील,प्रा.प्रशांत धनवे,तानाजी जाधव,दिलीपकुमार धनवे,राजकुमार धनवे,संजय तेली,कृषी सहाय्यक विक्रम भोजने,विनोद गणेशकर,गोटू गणेशकर,संतोष गणेशकर,सिद्धापूरचे दामाजी शुगरचे संचालक दयानंद सोनगे,महादेव जाधव,संतोष सोनगे,अशोक तळे,बाळासाहेब भरगुंडे,रणजीत रजपूत,कुंडीलाल तांबोळी,किसन भजनावळे तसेच धनलक्ष्मी पतसंस्थेचे सर्व कर्मचारी यांचेसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.


यावेळी राहुल बनसोडे,प्रफुल्ल सोमदळे,अरुण गुंगे,प्रमोद महामुनी,चंद्रजीत शहा,प्रा.विनायक कलुबर्मे,अरुण गुंगे,चंद्रजीत शहा,प्रणव हेंबाडे,गणेश मोरे,सतिश दत्तू,ओम नागणे,पांडुरंग कोंडूभैरी,प्रकाश दिवसे,चंद्रकांत चेळेकर,यश महामुनी,राजाभाऊ गणेशकर,विष्णू भोसले आदिजण निर्मल संदेश यात्रेत सहभागी होते.


test banner