मंगळवेढा:-
छत्रपती संभाजी महाराजांच्या आदर्शवत विचारांची ओळख तरुणांना व्हावी यासाठी महाराजांच्या समाधीस वंदन करण्यासाठी वारी परिवार सायकल क्लब तुळापूर-वढू कडे मार्गस्थ झाला.
सुरवातीस शिवालयातील शिवमुर्तीचे पूजन जयदीप रत्नपारखी सॅप पार्टस चे प्रतिनिधी सुहास कोळी राहुल यादव अमोल क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात करण्यात आले.
यावेळी दत्तात्रय भोसले भाऊसाहेब उन्हाळे,प्रा.विक्रम पवार,राजवीर हजारे,माणिक गुंगे,स्वराज कलुबर्मे,प्रणव हेंबाडे,अशोक जावळे समर्थ पवार,सुजय पवार,संग्राम भोसले उपस्थित होते.
तुळापूर-वढू बुद्रुक या २५४ किलोमीटच्या ऐतिहासिक सायकल मोहीमेतून आजही या परिसरात इतिहासाची साक्ष देत असलेले संगमेश्वर मंदिर,भीमा,भामा आणि इंद्रायणी या तीन नद्याच्यां संगमावरती असलेले तुळापूर-वढू बुद्रुक ही देशातील खरी तीर्थक्षेत्रे आहेत या ठिकाणाची माहिती तरुणांना व्हावी तसेच पर्यटन विकास जनजागृतीसाठी माहितीपर पत्रके वाटून प्रबोधन करण्यात येणार आहे.
सदर ऐतिहासिक सायकल मोहीम तीन दिवसाची असुन पंढरपूर-करकंब-परिते-टेंभूर्णी-इंदापूर-भिगवण-पाटस-यवत-उरळी कांचन-थेऊर-केसनंद-तुळापूर-भीमा कोरेगाव-वढू बुद्रुक येथे समारोप होणार आहे.
सदर सायकल मोहीमेकरीता सॅप पार्टसचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रसाद कुलकर्णी,श्री सायकल कंपनीचे मालक महेश नागणे,डॉ.शरद शिर्के,जयदीप रत्नपारखी,अंकुश आवताडे यांचे विशेष सहकार्य लाभले सदर ऐतिहासिक सायकल मोहीमेत जयंत पवार,शरद हेंबाडे,संजय जावळे,स्वप्निल टेकाळे ,भारत नागणे,समर्थ महामुनी,सिद्धेश्वर,डोंगरे,प्रमोद महामुनी,पवन टेकाळे,विराज डोरले,गणेश मोरे,निखिल दत्तू ,कृष्णा दत्तू,शुभम टेकाळे,रतिलाल दत्तू ,समीर गुंगे,राजाभाऊ गणेशकर,प्रा.विनायक कलुबर्मे,अरुण गुंगे,सतिश दत्तू,पांडुरंग कौन्डुभैरी,चंद्रकांत चेळेकर,प्रकाश मुळीक,फारुख मुजावर,महेश डोरले ,प्रकाश दिवसे,नाना भगरे,यश महामुनी,प्रफुल्ल सोमदळे हर्षद जावळे,शिवतेज कलुबर्मे आदीजण सहभागी झाले आहेत.