वारी परिवाराने मतदान जनजागृती केलेल्या गावात मतदानात भरघोस वाढ. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, ५ डिसेंबर, २०२४

वारी परिवाराने मतदान जनजागृती केलेल्या गावात मतदानात भरघोस वाढ.


मंगळवेढा:-

सोलापूर जिल्हधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलेल्या आवहानानुसार नुकत्याच संपन्न झालेल्या २५२ पंढरपूर विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन इथापे,मंगळवेढा तहसिलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकरी मदन जाधव व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकरी डॉ.चरणकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श आचार संहिता जपत लोकशाहिच्या उत्सवात नागरिकांचा सहभाग वाढावा व मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मंगळवेढ्यातील सामाजिक उपक्रमात नेहमी कार्यरत असणाऱ्या वारी परिवार सायकल क्लबच्या वतीने मरवडे,खोमनाळ,आंधळगाव,ब्रम्हपुरी माचणूर,कचरेवाडी,मारापूर,घरनिकी,फटेवाडी,तळसंगी,खुपसंगी,पाठखळ व मंगळवेढा शहर या गावात पहाटे सायकलवरती जाऊन मतदान जनजागृती करण्यात आली होती.


सदर प्रत्येक गावात लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या मतदानापेक्षा विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी मोठया प्रमाणात वाढलेली असून वारी परिवाराच्या स्तुत्य उपक्रमास यश प्राप्त झाले आहे.


मतदान जनजागृती सायकल अभियानातून मतदारांना साद घालण्यात आली होती व त्याला प्रतिसाद देऊन नागरिकांनी उत्स्फूर्त मतदान केले असून खऱ्या अर्थाने मतदार राजा जागा झाला आहे.


वारी परिवार सायकल क्लबने मतदान जनजागृती करून राष्ट्रीय कार्यात मोलाचे योगदान दिले आहे.मतदान जनजागृती केलेल्या मरवडे लोकसभा 58.57 विधानसभा 69.75 वाढलेली टक्केवारी 11.18,खोमनाळ लोकसभा 66.71 विधानसभा 72.05 वाढलेली टक्केवारी 5.34,ब्रह्मपुरी लोकसभा 60.71 विधानसभा 76.10 वाढलेली टक्केवारी 15.39,माचणूर लोकसभा 65.84 विधानसभा 77.05 वाढलेली टक्केवारी 11.21,आंधळगाव लोकसभा 59.29  विधानसभा 72.68 वाढलेली टक्केवारी 13.39,कचरेवाडी लोकसभा 55.48 विधानसभा 67.41 वाढलेली टक्केवारी 11.93,घरनिकी लोकसभा 66.38 विधानसभा 81.03 वाढलेली टक्केवारी 14.65,मारापूर लोकसभा 69.41 विधानसभा 77.05 वाढलेली टक्केवारी 7.64,खुपसंगी लोकसभा 54.74 विधानसभा 67.33 वाढलेली टक्केवारी 12.59,पाठखळ लोकसभा 65.68 विधानसभा 74.66 वाढलेली टक्केवारी 8.98,फटेवाडी लोकसभा 62.47 विधानसभा 74.81 वाढलेली टक्केवारी 12.34,तळसंगी लोकसभा 62.48 विधानसभा 74.05 वाढलेली टक्केवारी 11.57,मंगळवेढा लोकसभा 50.50 विधानसभा 60.33 वाढलेली टक्केवारी 09.83 आदी गावातील मतदानाची टक्केवारी वाढली आहे.


यशस्वी केलेल्या उपक्रमाबद्दल वारी परिवार सायकल क्लबचे तहसिलदार मदन जाधव यांनी प्रशासनाच्या वतीने कौतुक करून आभार मानले.


test banner