मंगळवेढा:-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा कार्याध्यक्षपदी संतोष रंदवे यांची निवड करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.त्यावेळी रंदवे म्हणाले की शरद पवार यांचे विचार तळागाळात पोहोचवून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे काम तळागाळापर्यंत पोहोचवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नवीन ऊर्जा मिळवून देण्यामध्ये त्यांचं मोलाचे योगदान आहे.
तसेच पक्षाकडून घेतले जाणारे कार्यक्रम उपक्रम यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो,त्यांची शरद पवार व पक्षावर असणारी निष्ठा,पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी संतोष अंकुश रंदवे यांची पंढरपूर मंगळवेढा विधानसभा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.
सदर निवडी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रांतिक सदस्य राहुल शहा,तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील,शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी,तालुका कार्याध्यक्ष माणिक गुंगे,युवक तालुका अध्यक्ष अजिंक्य बेंद्रे,युवक शहराध्यक्ष जमीर इनामदार,शहर उपाध्यक्ष वैभव ठेंगील,शहर सरचिटणीस अनवर मुल्ला,सचिन वडतीले,नागेश राऊत,पंडित गवळी,सागर गुरव,सदाशिव माळी,बापू वस्त्रे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.