मंगळवेढा:-
श्री संत दामाजी महाविद्यालयात राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या शिक्षण सप्ताहाच्या दिनांक २७ जुलै या सहाव्या दिवशी इयत्ता ११ वी व १२ वी कनिष्ठ स्तरावर ३० विदयार्थ्यांची निवड करून इको क्लबची स्थापना करण्यात आली.
सदर क्लब कडून पर्यावरण रक्षण जनजागृतीसाठी महाविद्यालयाच्या परिसरात स्वच्छता करून वृक्षारोपण करण्यात आले यावेळी इको क्लबच्या मार्गदर्शकपदी प्रा.राजेंद्र गायकवाड,समन्वयकपदी प्रा.महेश डोके यांची तर अध्यक्षपदी मानशी बिराजदार यांची निवड करून सर्वांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रास्तविक प्रा.शैलेंद्र मंगळवेढेकर यांनी केले तर प्रा.विनायक कलुबर्मे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले केले यावेळी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.शैलेंद्र मंगळवेढेकर,प्रा.महेश डोके,प्रा.संगाप्पा पाटील,प्रा.उत्तम सूर्यगंध,प्रा.धनाजी गवळी,प्रा. राजकुमार मुळीक,प्रा.राजेंद्र नागणे,प्रा.विजय दत्तू यांचेसह सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.