मंगळवेढा:-
मंगळवेढा तालुका माजी सैनिक संघटना व वारी परिवाराच्या वतीने कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करून रोप्य महोत्सवी २६ जुलै कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला.
सुरवातीस सैनिकांच्या शौर्याची प्रतिक असलेल्या बंदुकीचे पुजन पोलीस निरीक्षक महेश ढवाण व वीरपत्नी शामलताई माने,सविता ठोंबरे,लक्ष्मी पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी सैनिक संघटनेचे मुबारक मुलाणी,आबाजी जाधव,महादेव दिवसे,दयानंद गायकवाड,कृष्णा पडवळे,शंकर जाधव,ज्ञानेश्वर रायबान,शिवानंद पाटील,बसन्ना एडके,हैदर इनामदार प्रकाश दिवसे,प्रकाश लिगाडे,याजीन इनामदार,शिवाजी दिवसे,सय्यद इनामदार,बाळासाहेब पवार,आप्पासाहेब कोडक,ज्ञानू रायबान,महादेव गांडुळे,बाबासाहेब माने,सिद्धेश्वर कनुरे,ज्ञानेश्वर शिंदे,धनाजी शिंदे,लोखंडे,भारत उन्हाळे,के.के. लीगाडे,राजाराम होनमाने,राजू आडके,गोरख शिंदे,सुरेश मरळे,उमेश सावंजी तसेच मारुती वाकडे, येताळा भगत,विजय खवातोडे,नारायण गोवे,अजीत जगताप, सोमनाथ आवताडे,राजाभाऊ चेळेकर,दत्तात्रय भोसले,मनोज माळी,दिगंबर भगरे,सचिन इंगळे, हुकुम मुलानी,महादेव धोत्रे,प्रशांत मोरे,रमेश जोशी,रामचंद्र दत्तू,विलास आवताडे,संजय माळी,दिलावर मुज़ावर,माणिक गूंगे,प्रफुल्ल सोमदळे,राजवीर हजारे,अरूण गूंगे,रवि जाधव,फारूख मुजावर,अजय अदाटे,सतिश दत्तू उपस्थित होते.
सदर देशभक्तीपर कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष मलय्या स्वामी,सूत्रसंचालन प्रा.विनायक कलुबर्मे व आभार चंगेजखान इनामदार यांनी केले.