मंगळवेढा:-
श्री संत दामाजी महाविद्यालयात राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या शिक्षण सप्ताहाच्या दिनांक २८ जुलै या सातव्या दिवशी इयत्ता ११ वी व १२ वी कनिष्ठ स्तरावर विदयार्थ्याना व शिक्षकांना एक युद्ध नशेविरुद्ध या उपक्रमा अंतर्गत अंमली पदार्थ व तंबाखू सेवनविरुद्ध शपथ घेऊन शिक्षण सप्ताहाचा समारोप करण्यात आला.
दिनांक २२ जुलै ते २८ जुलै २०२४ या कालावधित महाविद्यालयात विविध आनंददायी शिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्यसनाचे दुष्परिणाम सांगून सद्यस्थितीत समाजातील वाढते प्रमाण लक्षात घेता विद्यार्थ्यांनी व्यसनाच्या आहारी जाऊ नये यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.राजेंद्र गायकवाड यांनी व्यसनमुक्तीची शपथ दिली.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांना बिस्किटे व फळे वाटून राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन प्रा.विनायक कलुबर्मे यांनी केले यावेळी इको क्लब मधील सर्व विद्यार्थी व सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.