श्री संत दामाजी महाविद्यालयात पाणी वाचवा व इतरांना मदत करणे विषयी विदयार्थ्यांचा जागर गणित व विज्ञान कोड्यातून मिळाली बुद्धीला चालना. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, २२ जुलै, २०२४

श्री संत दामाजी महाविद्यालयात पाणी वाचवा व इतरांना मदत करणे विषयी विदयार्थ्यांचा जागर गणित व विज्ञान कोड्यातून मिळाली बुद्धीला चालना.


मंगळवेढा:-

श्री संत दामाजी महाविद्यालयात राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या शिक्षण सप्ताहाच्या दिनांक २२ जुलै या पहिल्या दिवशी इयत्ता ११ वी व १२ वी कनिष्ठ स्तरावरील विदयार्थ्यांनी पाणी वाचवा विषयी घोषवाक्ये व दुसऱ्यांना नेहमी मदत करा विषयी पोस्टर्स सादरीकरणातून  सामाजिक संदेश देऊन जागर घातला.


सुरवातीस स्वछतेचे जनक संत गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ.औदुंबर जाधव,उपप्राचार्य प्रा.राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते करून शुभारंभ करण्यात आला.


यावेळी विदयार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवत रस्ता ओलांडताना वयोवृद्ध लोकांना मदत करा,भुकेल्यांना अन्न द्या,अपघातग्रस्ताना मदत करा,डोंगर माथ्यावर चढताना खाली राहिलेल्यांना आधार द्या असे आशयाच्या पोस्टर्स मधून मदतीचा हाथ पुढे करा असा संदेश दिला तर पाण्याची बचत काळाची गरज आहे याविषयाची घोष वाक्ये दाखवून पाणी बचतीच्या घोषणा देऊन जागर घालण्यात आला.


तसेच गणित व विज्ञान विषयातील विविध कोडी विदयार्थ्यांना देऊन विदयार्थ्यांच्या बुद्धीला चालना देण्यात आली.यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.


सदर शिक्षण सप्ताहाचे प्रास्तविक उपप्राचार्य प्रा.राजेंद्र गायकवाड यांनी केले तर प्रा.विनायक कलुबर्मे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.


test banner