श्री संत दामाजी महाविद्यालयात सोमवार पासून शिक्षण सप्ताहाचे अयोजन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, २० जुलै, २०२४

श्री संत दामाजी महाविद्यालयात सोमवार पासून शिक्षण सप्ताहाचे अयोजन.


मंगळवेढा:-

श्री संत दामाजी महाविद्यालयात इयत्ता ११ वी व १२ वी कनिष्ठ स्तरावर राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै २०२४ या कालावधीत शिक्षण सप्ताहाचे अयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. औदुंबर जाधव यांनी दिली.


सोमवारपासून पुढील एक आठवडा अध्ययन अध्यापन साहित्य दिवस,मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस,क्रीडा दिवस,सांस्कृतिक दिवस,कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस,मिशन लाईफच्या दृष्टीक्षेपात इको क्लब उपक्रम शालेय पोषण दिवस व समुदाय सहभाग दिवस साजरा केला जाणार आहे.


यामध्ये पाणी वाचवा घोषवाक्ये,इतरांना मदत कशी करावी या विषयाचे पोस्टर्स तयार केले जाणार आहेत.तसेच मैदानी,शारीरिक व डिजिटल स्वरूपाचे खेळ,कोडी,भौमितिक चित्रे,वाचन कट्टा,असे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.


त्याचबरोबर शिक्षक,पालक व विद्यार्थी यांच्या माध्यमातून वेशभूषा,पारंपरिक कला,कथाकथन,लोकगीते,लोकनृत्य,पथनाट्य सादरीकरण केले जाणार असून पर्यावरण जागृतीसाठी वृक्षारोपण केले जाणार आहे.


तसेच ऐतिहासिक वारसा जतन व संवर्धन करीता अनेक  ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यात येणार आहेत.तर महाविद्यालयात पालकांच्या व मदत करणाऱ्या समाजातील अनेक नागरिकांच्या उपस्थित समारोप होणार आहे.सदर शिक्षण सप्ताह यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य प्रा.राजेंद्र गायकवाड यांचेसह सर्व शिक्षक परिश्रम घेत आहेत.


test banner