मंगळवेढा:-
श्री संत दामाजी महाविद्यालयात राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या शिक्षण सप्ताहाच्या दिनांक २३ जुलै या दुसऱ्या दिवशी कनिष्ठ स्तरावरील विदयार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांच्या माध्यमातूम भौमितिक रांगोळ्या,पोस्टर सजावटीतुन कलात्मक अविष्कार साकारत आनंददायी शिक्षणाची ओळख करून दिली.
यावेळी गणित-भूमिती विषयातील अनेक आकृत्या रंगीबेरंगी रांगोळ्यातुन साकरण्यात आल्या तसेच वाचन कट्टा या उपक्रमातून हरवत चाललेल्या वाचन संस्कृतीला पुन्हा एकदा उर्जीत अवस्था यावी व त्यातून विदयार्थ्यांच्या मनात वाचनाची गोडी लागावी याकरिता ग्रंथालयातील विविध पुस्तकांचे वाचन करण्यात आले तर पोस्टर्स सजावटी मधून अनेक सामाजिक संदेश व बोधात्मक विचार मांडण्यात आले.
सदर शिक्षण सप्ताहात विदयार्थ्यांना कथा या साहित्य प्रकाराची ओळख हसत खेळत व्हावी यासाठी प्रा.धनाजी गवळी यांनी दोन मेणबत्त्या या कथेचे कथाकथन करून विदयार्थ्यांना चांगल्या मूल्यांची ओळख करून दिली तर बबल्या चितेवरून पळाला या विनोदी कथेतुन हास्यांचे फवारे उडवीत विदयार्थ्यांची मने जिंकली.
सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.उत्तम सूर्यगंध,प्रा.विजय पावले,प्रा.अप्पासाहेब ढाणे,प्रा.श्रीराम पवार,प्रा.दादासाहेब देवकर,प्रा.सारिका काटे,प्रा.शारदा खुणे,प्रा.प्रियंका शिंदे,प्रा.कविता क्षीरसागर,प्रा.विजय दत्तू यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा.राजेंद्र गायकवाड यांनी केले तर प्रा. विनायक कलुबर्मे व प्रा.निर्मला सावंत यांनी सूत्रसंचालन केले यावेळी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.