संत गजानन महाराजांच्या पालखी सोबत वारी परिवाराची माचणूर- मंगळवेढा सायकल वारी. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, १४ जुलै, २०२४

संत गजानन महाराजांच्या पालखी सोबत वारी परिवाराची माचणूर- मंगळवेढा सायकल वारी.


मंगळवेढा:-

श्री क्षेत्र शेगावहुन आषाढी सोहळ्यासाठी पंढरपूरला निघालेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचा माचणूर येथील मुक्काम उरकल्यानंतर मंगळवेढ्याकडे मार्गस्थ झालेल्या पायी पालखी सोबत वारी परिवार सायकल क्लबने माचणूर-मंगळवेढा सायकल वारी पूर्ण केली. 


यावेळी सहभागी सायकलस्वारांनी श्री गजानन महाराजांचे दर्शन घेत जयघोष केला काही दिवसापूर्वीच भक्तिमय वातावरणात तृतीय अखिल महाराष्ट्र पंढरपूर सायकलवारी संमेलनात देखील वारी परिवार सायकल क्लबने पर्यावरण पूरक वारी पूर्ण केली आहे.


यावेळी ब्रह्मपुरी येथे ग्रामस्थांच्या वतीने तर माचणूर येथे सिद्धेश्वर मंदिर संस्थानच्या वतीने स्वागत करण्यात आले.याअगोदरही सायकल क्लबने अनेकवेळा महाशिवरात्री निम्मित मंगळवेढा-माचणूर सायकल राईड काढलेल्या आहेत.


सदर सायकल वारी मध्ये चंद्रजीत शहा,सिद्धेश्वर डोंगरे,डॉ.राहुल शेजाळ,महेश अलिगावे,विवेकानंद वाले,आरमान शेख,पवन टेकाळे,प्रफुल्ल सोमदळे,प्रा.विनायक कलुबर्मे,सतीश दत्तू आदी सदस्य सहभागी होते.


test banner