म.न.से.शहराध्यक्ष राजवीर हजारे यांचे भगीरथ भालके यांना या साठी चा पाठपुरावा करावा याचे निवेदन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, १३ जुलै, २०२४

म.न.से.शहराध्यक्ष राजवीर हजारे यांचे भगीरथ भालके यांना या साठी चा पाठपुरावा करावा याचे निवेदन.


मंगळवेढा:-

मंगळवेढा येथील कृष्ण तलाव येथे ४६ एकरात भव्य अशी संत सृष्टी उभा करण्याबाबत आपणही पाठपुरावा करावा याबाबतचे निवेदन मनसेकडून भगत भालके यांना देण्यात आले. 


संत शिरोमणी चोखामेळा स्मारकाबाबत झालेली बैठक यशस्वीरित्या पार पडली. त्या बैठकीमध्ये चोखामेळा स्मारकाबद्दल सकारात्मक चर्चा चांगल्या रीतीने झाली.

 

मंगळवेढा शहरामध्ये लवकरच संत शिरोमणी चोखामेळा यांचे भव्य दिव्य असे स्मारक होईल यात कुठल्याही प्रकारची शंका नाही असे मत राजवीर हजारे यांनी व्यक्त केले.


पुढे बोलताना हजारे यांच्याकडून संत सृष्टीसाठी व मंगळवेढा संतांच्या इतिहासासाठी आपल्या सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे व मंगळेकरांनी या गोष्टीसाठी एकत्र यावे असे आव्हान त्यांनी केले.


पुढे बोलताना ते म्हणाले संत भूमीचा प्रश्न म्हटलं की सर्वजण कानाडोळा करतात पण मंगळवेढा शहरात नवीन काय करायचं असेल तर सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे.मग त्यामध्ये राजकीय पक्ष असो किंवा सामान्य नागरिक सर्वांनी मिळून ताकद दाखवली तर संतसृष्टी होण्यास वेळ लागणार नाही असे ते बोलताना म्हणाले. 


मंगळवेढा येथील कृष्णा तलाव येथे व्हावी यासाठी हजारे यांनी वारंवार मंगळवेढा शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि इथून पुढेही कोणत्याही परिस्थितीत कोणाचीही गाठ भेट घेण्याची गरज असल्यास गाठभेट घेऊन प्रश्न सोडवण्यास कटिबद्ध राहणार असल्यास सांगितले. 


काही तांत्रिक अडचणीमुळे स्मारक होऊ शकत नाही हे आपण मान्य करून सर्वांनी एकत्रित येऊन जर पाठबळ दर्शवले तर अडचण शासनाकडून दूर होईल. 


श्रीकृष्ण तलाव येथे उभा केल्यानंतर गावाला एक नवीन ओळख निर्माण होईल गावात अनेक छोटे मोठे व्यवसाय उद्योगधंदे सुरू होते दळणवळण वाढेल पर्यटन स्थळ होण्यास वाव मिळेल. 


गावातील बेरोजगार तरुणांना व्यवसायाची संधी मिळेल सर्वांना याचा फायदा होईल व मंगळवेढ्याचा इतिहास सर्वांना समजण्यास मदत होईल. 


तरी मंगळवेढा शहरातील मोठ्या राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी हे कार्य मनावर घेऊन तडीस न्यावं यासाठी सर्वप्रमुखांना भेट देऊन त्यांना कार्यतडीस नेण्यासाठी प्रयत्न करा असे सांगणार आहे असे हजारे म्हणाले. 


फक्त संत सृष्टी वरच आपण गप्प बसणार नाही तर मंगळवेढा शहरांमध्ये 14 संत आहेत यांच्या संदर्भात सुद्धा पाठपुरावा करणार असल्याचे त्यांच्या कडून सांगण्यात आले.


मंगळवेढा मध्ये एक संतांचे वैभव उभा करण्यासाठी सर्वांनी पाठबळ द्यावे व एकत्रित यावे अशी अपेक्षा हजारे यांनी व्यक्त केली.


या वेळी म.न.से.शहराध्यक्ष राजवीर हजारे,कृष्णा ओमने,सतीश दत्तू,किरण हजारे,सुरज हजारे,पडवळे आदी.उपस्थित होते.


test banner