मंगळवेढा:-
श्री संत दामाजी महाविद्यालय कनिष्ठ विभागाच्या शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा.शैलेश चंद्रकांत मंगळवेढेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाच्या वतीने उपप्राचार्य प्रा.राजेंद्र गायकवाड यांनी प्रा.मंगळवेढेकर यांना शुभेच्छा देऊन सत्कार केला.यावेळी प्रा.मंगळवेढेकर म्हणाले महाविद्यालयातील शिक्षकांचे आज अनेक प्रश्न आहेत सदरचे प्रश्न शासन दरबारी मांडून न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.
जुनी पेन्शन योजना,कॅशलेस,चुकीची शैक्षणिक धोरणे,अंमलबजावणीतील त्रुटी अशा अनेक प्रश्नासाठी मार्ग कसा काढायचा? यासाठी संघटना हेच माध्यम आहे जिल्हास्तरावरील संघटनेचे पदाधिकारी यांच्याशी समन्वय साधून काम करणार आहे.
यासाठी एकीचं बळ खूप महत्वाचं असून अनुदानित-अशंता अनुदानित असा कुठलाच भेद न करता सर्वांनी एकदिलाने शिक्षकांच्या प्रश्नासाठी लढणे आवश्यक आहे.
केवळ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोडून चालणार नाही,आपली साथ,सहकार्य कायम संघटने बरोबर असणे आवश्यक आहे.
भविष्यात आपल्या सर्वांची साथ मिळणारच असल्यामुळे विचारानेच लढून आपल्या मागण्या व प्रश्न सोडविणार आहे.असे सांगून सर्वांचे आभार मानले यावेळी कनिष्ठ विभागातील सर्व शिक्षक,शिक्षिका उपस्थित होते.