मंगळवेढा:-
मंगळवेढा-पंढरपूर रस्त्यालगत पाच वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या पाच हजार झाडांपैकी वटपोर्णिमा साजरा करण्यात येणाऱ्या सणासाठी आवश्यक असणाऱ्या 1000 वडाच्या झाडांना पाच वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वारी परिवाराच्या वतीने वडाच्या झाडाचा पाचवा वाढदिवस वटपौर्णिमा सणाचे औचित्य साधून या भागात राहणाऱ्या कष्टकरी महिलांच्या हस्ते वडपूजन करून त्यांना साडी चोळीचा सन्मान करून साजरा करण्यात आला.
पाच वर्षांपूर्वी हभप शिवाजी महाराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती व वारी परिवाराने मंगळवेढा-पंढरपुर रोडला लावलेली 1000 वडाची झाडे सावली व ऑक्सिजन देऊन पर्यावरणाचे रक्षण करत आहेत.वड हे देशी वृक्ष असुन मानव जातीला लागणारा ऑक्सिजन देणारे झाड आहे.
भविष्यकालीन पिढीला ऑक्सिजन निर्माण करायचा असेल तर वडाची झाडे लावून,संवर्धन करूनच वटपोर्णिमेसारखे सण साजरे करणे काळाची गरज बनणार आहे म्हणूनच काळाची पाऊले ओळखून मंगळवेढा -पंढरपूर या हरीत पालखी महामार्गावर पाच वर्षांपूर्वी हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला होता.
हल्लीच्या काळात वृक्षारोपण करण्याचे पेव आले आहे.मात्र वृक्ष जतन हे त्यातील अत्यंत कमी प्रमाणात होत असल्याने वृक्षारोपणाचा खरा उद्देश सफल होत नाही.यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड करत असताना वृक्ष जोपासणे त्याचे संरक्षण करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी वडांचे झाड हे आपल्याला निसर्गाचा समतोल राखण्याचे संदेश देते म्हणून याची पूजा करण्याची आली. असल्याचे वारी परिवाराचे अध्यक्ष सतीश दत्तू यांनी सांगितले यावेळी दत्तात्रय भोसले,अजय अदाटे,विजय हजारे,रवी जाधव, प्रफुल्ल सोमदळे,विनायक कलुबरमे, विक्रम पवार,सचिन इंगळे उपस्थित होते.वडाच्या झाडाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आनंद मर्दा यांचे सहकार्य लाभले.