राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून या मागणीचे निवेदन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, ३० मे, २०२४

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून या मागणीचे निवेदन.


मंगळवेढा:-

मंगळवेढा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे व लोकांच्या घरांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना योग्य ती भरपाई मिळावी यासाठी चे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार मंगळवेढा तालुका यांच्या वतीने देण्यात आले.


यामध्ये पाऊस व वादळी वाऱ्यांमुळे लोकांच्या वस्तीवरील घरावरील पत्रे उडून गेले.मोठ्ठ्या प्रमाणात इमारतींचे झालेले नुकसान,झाडे झुडपे उनमळून पडली असून गावातील झालेल्या नुकसानाची भरपाईची योग्य मोबदला द्यावा अशी या निवेदाद्वारे मागणी करण्यात आली.


यामध्ये दुष्काळी तालुक्यातील जनता एकीकडे पाणी नाही म्हणून दुष्काळाच्या झळा सोसत आहे व दुसरीकडे अवकाळी पावसाने आर्थिक नुकसान झाले आहे अशा दोन्ही बाजूने अडचणीत सापडलेल्या गावकऱ्यांना पंचनामे करून आर्थिक मदत राज्य सरकारने त्वरित उपलब्ध करून द्यावी ही विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे मंगळवेढा तालुक्याचे प्रांतिक अध्यक्ष राहुल शहा,मंगळवेढा तालुका अध्यक्ष प्रथमेश पाटील, मंगळवेढा शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी,मंगळवेढा युवक तालुका अध्यक्ष अजिंक्य बेदरे,युवक मंगळवेढा शहराध्यक्ष जमीर इनामदार,सामाजिक न्याय विभाग मंगळवेढा शहराध्यक्ष बबन ढावरे सर,मंगळवेढा शहर उपाध्यक्ष वैभव ठेंगील,शहर उपाध्यक्ष सचिन वडतीले, सरचिटणीस सुहास मुरडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


test banner