मंगळवेढा:-
आपल्या अलौकिक भक्तीतून भगवंताच्या ह्रदयात स्थान निर्माण करणारे संत मांदीयाळीतील खरे संत म्हणजे चोखोबाराय आहेत असे विचार हभप निवृत्ती माधव नामदास महाराज यांनी सांगितले ते मंगळवेढा येथे संत चोखाबाराय यांच्या ६८६ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या काल्याच्या किर्तनात बोलत होते.
सुरवातीस संत चोखोबाराय यांच्या समाधीस महाअभिषेक करुन पूजन करण्यात आले यावेळी नामदास महाराज यांनी संत जनाबाई यांच्या चार चरणाच्या अभंगातून संत चोखोबारायांची भक्ती किती श्रेष्ठ होती याचे महात्म्य वर्णिले चोखोबारायांच्या जन्मापासून ते त्यांच्या कार्यावरती प्रकाश टाकत अनेक दाखले दिले नामदेव महाराजांचे शिष्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत चोखोबारायांनी अगदी त्या काळात पांडुरंगालाच परखडपणे जाब विचारला होता संत पंरपरेत विठ्ठलभक्ती करणारे चोखामेळा,सोयराबाई,बंका,निर्मला हे संपूर्ण कुटुंब विठ्ठलभक्तीत दंग झालेले होते असे सांगून भक्तिरसाचा अखंड झरा हे चोखामेळा यांचे कुटुंब आहे असे सांगून अभिवादन केले.
तीन दिवशीय चाललेल्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त दि २६ मे ते २८ मे २०२४ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दि २६ मे रोजी दिंडी प्रदक्षिणा,विणापूजन करण्यात आले तर हभप वैशाली महाराज धायगुडे,बारामती यांचे किर्तन संप्पन्न झाले २७ मे रोजी झी टॅाकिज फेम हभप संस्कार महाराज खंडागळे यांचे किर्तन पार पडले.
तसेच अनेक महिला व पुरुष भजनी मंडळानी सामुहिक संगीत भजन सादर केले तर दि.२८ मे रोजी संत चोखोबाराय यांच्या स्मृतीदिनानिमित्त सकाळी ९ वाजता समाधीस्थळी महाभिषेक सोहळा व सकाळी ११ वाजता हभप निवृत्ती माधव नामदास महाराज यांचे काल्याचे किर्तन संप्पन्न झाले.
यावेळी समाधीस्थळी पुष्पवृष्टी करुन दत्तात्रय भोसले व उदय इंगळे यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करुन पुण्यतिथीची सांगता करण्यात आली यावेळी मोठ्या संखेने वैष्णव भक्तगण,नागरीक उपस्थित होते सदर स्मृतीदिन सोहळा पार पडण्यासाठी श्री संत चोखामेळा मंदिर समिती,वारी परिवार व अखिल भाविक वारकरी मंडळांनी परिश्रम घेतले.