हळहळ!मंगळवेढा येथील या प्रसिद्ध उद्योजकाचे अपघाती निधन.मंगळवेढा तालुक्यावर शोककळा. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, ३ जून, २०२४

हळहळ!मंगळवेढा येथील या प्रसिद्ध उद्योजकाचे अपघाती निधन.मंगळवेढा तालुक्यावर शोककळा.


मंगळवेढा:-

आज पहाटेच्या 5 ते 6 च्या सुमारास मंगळवेढा येथील प्रसिद्ध उद्योजक सुहास ताड यांच्या सायकलीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.


ही घटना सांगोला येथे सांगोला पंढरपूर रोड वरील कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ घडली.सुहास शशिकांत ताड (वय 46,मंगळवेढा) असे मयत झालेल्या उद्योजकाचे नाव आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की सुहास ताड हे नेहमीप्रमाणे पहाटेच्या वेळी सायकलिंग करत होते.


ते नेहमी प्रमाणे मंगळवेढा सांगोला रस्त्यावरती सायकलिंग करत असताना सांगोला येथून पंढरपूर रोडच्या दिशेने येत असता पाठीमागून वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या सायकलीला जोराची धडक दिली.


सुहास ताड हे वारी परिवार सायकल क्लब चे सदस्य होते तसेच ते शांत संयमी उद्योजक देखील होते.सुहास ताड यांच्या निधनाने मंगळवेढा तालुक्यात शोककळा पसरली आहे.


सांगोला सायकल क्लबच्या वतीने अज्ञात वाहन धारकाचा तपास करावा अशी मागणी करण्यात आली आहे.


test banner