इयत्ता दहावी 2004 चा स्नेह मेळावा वीस वर्षानंतर संपन्न. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, २७ मे, २०२४

इयत्ता दहावी 2004 चा स्नेह मेळावा वीस वर्षानंतर संपन्न.



मंगळवेढा:-

मंगळवेढा वीस वर्षांपूर्वी आपण ज्या शाळेत शिकलो तसे ज्या बेंचवर बसून शिकलो त्याचा आनंद वीस वर्षानंतर विद्यार्थ्यांनी घेतला पुन्हा एकदा शाळेत जाण्याचा तसेच दिवसभराचा आनंद अनुभवला इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथील इयत्ता दहावीच्या 2004 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा वीस वर्षानंतर स्नेह मेळावा रंगला इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथील 2004 मध्ये दहावी मध्ये शिकलेल्या विद्यार्थी यांचा वीस वर्षांत झालेला बदल अनुभवण्यास उत्सुक होते.


कार्यक्रमाची सुरुवात प्रत्येक वर्गाची वेगवेगळ्या रांगा करून राष्ट्रगीत प्रार्थना व संविधान वाचन करून घेण्यात आली. यावेळी विद्यार्थी प्रार्थनेनंतर रांगेत वर्गात गेले वर्गात गेल्यावर  शिक्षकांसमोर विद्यार्थ्यांनी स्वतःचे माहिती सांगून व सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणाची माहिती दिली व शिक्षकांनी देखील आपल्या वीस वर्षांपूर्वीच्या वर्गावरील अनुभव कथन केले.


तसेच विद्यार्थि ही शाळेविषयी वर्गातील वीस वर्षांपूर्वी शिक्षकांविषयी व वर्ग मित्रांबद्दल अनुभव कथन केले व होत असलेल्या गाठीभेटीबद्दल व खाली खुशाली एकमेकांना शेअर केल्या तसेच नवनवीन गोष्टींना देखील उजाळा मिळाला यावेळी कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष कदम प्रशालेची तत्कालीन मुख्याध्यापक श्रीधर भोसले,गजेंद्र गडकर सर,एस.एम.पाटील सर,डांगे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


यावेळी देशमाने सर,डी.बी.पाटील सर,काझी सर,के.सी.भोसले सर, हिरेमठ सर,माळी सर,मांडवे सर,आर.पी.पवार सर,मांडवे मॅडम, रेळेकर मॅडम,पाटील मॅडम,गोठणे सर,कुलकर्णी सर,गायकवाड सर, वाकळे सर,गोठणे सर,कदम मॅडम,काशीद सर हे शिक्षक उपस्थित होते.



यावेळी शिक्षकांचा सत्कार शाल श्रीफळ तसेच भगवत गीता गुलाब पुष्प व एक भेटवस्तू देऊन करण्यात आला.यावेळी मयत झालेल्या माजी शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


यावेळी अर्जुन आवताडे यांनी पोवाडा सादर केला तसेच उपजिल्हाधिकारी अभयसिह मोहिते यांनी प्रेमाचा जांगडगुत्ता यावर एक कविता ही सादर केली अनेक विद्यार्थ्यांनी कराओके वर आपली कला सादर केली.


यावेळी फनी गेम्स घेण्यात आली यात संगीत खुर्ची तळ्यात मळ्यात असे कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. 


यानंतर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला तसेच यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत फोटोसेशन करून सेल्फी पॉइंट वर फोटो काढण्यात सर्व विद्यार्थी मश्गूल होते. 


वीस वर्षानंतर एकमेकांना भेटल्याने अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला अनेकांना आपल्या शाळेतील मित्र-मैत्रिणींना वीस वर्षांनी भेटल्याने आनंद ओसंडून वाहत होता तसेच अनेकांनी ही भेट व या आठवणी पुढील आयुष्यभर प्रेरणादायी ठरतील असे सांगितले.


यावेळी विद्यार्थ्याबरोबर शिक्षकही भावुक झाले होते यापुढे आपणही असेच वेळ काढून घेत राहू असे एकमेकांना सांगून सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.


या कार्यक्रमाची प्रस्तावना आयोजक अश्फाक मुजावर यांनी केले तसेच सूत्रसंचालन विश्वास मुढे व अर्चना चव्हाण यांनी केले तर आभार  विशाल राजमाने यांनी मानले. 


या कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम ने झाली.


test banner