मंगळवेढा:-
इंग्लिश स्कूल,मंगळवेढा येथील सन २००४ मध्ये १० वी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा इंग्लिश स्कूल,मंगळवेढा येथे रविवार दि.२६ मे रोजी संपन्न होणार आहे.
२६ मे रोजी सकाळी ९.०० वा.राष्ट्रगीत,प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे व त्यानंतर शिक्षकांचा तास ही होणार आहे.
आपल्या काळातील जुने खेळ व फनी गेम्स च्या रूपातून विविध खेळ घेण्यात येणार आहेत.त्यानंतर स्नेह भोजन करून गुरुजनांचा सन्मान करण्यात येणार आहे.
२००४ साली दहावी उत्तीर्ण झालेल्या विविध कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या मित्र-मैत्रिणींनी एकत्र येऊन आपल्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण जगण्यासाठी त्या जुन्या बेंच वर बसण्याचा अनुभव घेण्यासाठी येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.