मनसे शहराध्यक्ष राजवीर हजारे यांच्या प्रयत्नांना यश, मंगळवेढा नगरपालिकेकडून मंगळवेढ्यातील सर्वात उंच या मूर्तीसाठी मंजुरी. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, २० एप्रिल, २०२४

मनसे शहराध्यक्ष राजवीर हजारे यांच्या प्रयत्नांना यश, मंगळवेढा नगरपालिकेकडून मंगळवेढ्यातील सर्वात उंच या मूर्तीसाठी मंजुरी.


मंगळवेढा:-

सर्व जनतेला तर माहीतच आहे की आपली मंगळवेढा ची भूमी संतांची भूमी म्हणून ओळखली जाते परंतु आज पर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांनी आपल्या मंगळवेढ्यातील संतांसाठी किंवा संतांच्या मंदिरांसाठी संतांच्या संपूर्ण इतिहासाबद्दल आज पर्यंत एवढे आमदार एवढे खासदार एवढे मंत्री मंगळवेढ्याच्या पावन भूमीत येऊन गेले परंतु नुसतं आश्वासनावर आश्वासन एवढेच देत गेले बाकी संतांचे म्हणून असं काही अस्तित्वचित उरलेलं नाही आणि दिसतही नाही त्याच अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंगळवेढा शहर यांच्या वतीने राजवीर हजारे यांनी सातत्याने पाठपुरावा करून व मंगळवेढ्याचा एक जणू विकास आराखडा बनवलेला आहे. 


अस दिसून  येतोय की राजवीर हजारे हे सातत्याने मंगळवेढ्यातील विविध संतांच्या पाठपुराव्यावर काम सुरू आहे तसेच मध्यंतरी मांडलेला मुद्दा म्हणजे श्रीकृष्ण तलावातील मंगळवेढातील सर्वात मोठी संतसृष्टी उभारण्याबाबत परंतु याकडेही मंगळवेढ्यातील नागरिकांचा असो या मंत्र्यांचा असो कोणाला काहीच देणं घेणं पडलेलं नाही असं दिसून आलं म्हणून राजवीर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने राजवीर हजारे यांनी माननीय राज साहेब ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना मंगळवेढ्यातील तिन्ही तलावांच्या बाबतीत माहिती व तेथील त्या तलावावर आपण कोणती गोष्ट करू शकतो याबाबत संपूर्ण माहिती राज साहेब ठाकरे यांना दिली.




त्यानंतर त्यांनी सकारात्मक उत्तर राज साहेब ठाकरे यांच्याकडून मिळालं आता मनसेच्या वतीने केलेला पाठपुरावा म्हणजेच आपल्या मंगळवेढ्यातील बोराळे नाका येथील सोलापूर कडे जाताना उजव्या हाताला म्हणजे बोराळे नाका चौकात बोराळे नाका चौकातील उजव्या हाताला स्मशानभूमीच्या भिंतीच्या शेजारील ची जागा आहे त्यावर ती 27 फुटी सर्व संतांना घेऊन उभे असलेले विठ्ठल मूर्ती यास नगरपालिका मंगळवेढा यांच्याकडून मंजुरी मिळालेली असून ते काम लवकरात लवकर सुरू होईल अशी आशा आहे.


नगरपरिषद मंगळवेढा यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या पाठपुराव्याला हिरवा कंदील दिला त्याबद्दल मी नगरपालिकेचे सीओ साहेब चरण कोल्हे साहेब यांचे राजवीर हजारे व  मनसे कडून आभार मानण्यात आले.


अशा अनेक बरेच प्रश्न आहेत जे मंगळवेढ्याच्या विकासासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कटिबद्ध आहे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली ही पहिली मागणी असून व मंगळवेढा शहरातील अशी एकमेव मूर्ती होणारा आहे की मंगळवेढ्यातील पहिली सर्वात उंच मूर्ती म्हणून ओळखली जाईल तसेच या बोराळे नाका चौकातील या भव्य मूर्तीमुळे चौकाची शोभा व शहराच्या सुंदरतेत भर पडणार असून तसेच मंगळवेढ्यात येणाऱ्या सर्व वारकरी व शेगावहून येणारी पालखी व कर्नाटकातून येणाऱ्या पालख्या यांना मंगळवेढ्यात प्रथम या सर्व संतांना घेऊन उभे असलेल्या विठ्ठल मूर्तीचे प्रथम दर्शन होणार आहे व वारकरी संप्रदायाला खूप अभिमान वाटेल अशीच गोष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हाती घेतली असून ती लवकरच आपल्या मंगळवेढा शहरात उभी राहनार आहे.


तसेच सर्व नागरिकांना आवाहन आहे की मंगळवेढ्यात आपल्या फक्त थोर संतांच्या पवित्र भूमीत या शब्दाचा वापर केला जातो पण संत कुठे आपल्याला अस्तित्वात दिसतच नाही अहो साधी गोष्ट बाहेरून येणारा वारकरी गाणं पत्र्याचे मंदिर त्यांना कुठे दिसत नाही यावर तर कोणाचाच आज पर्यंत लक्ष गेलं नाही कोणत्या जनतेला त्याचं काय देणे घेणे नाही थोर संतांच्या पवित्र भूमिका आपले सहर्ष स्वागत आहे या गोष्टीवर किती दिवस राजकारण करणार म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्याने संतांसाठी व मंगळवेढ्याच्या विकासासाठी कायमस्वरूपी कटिबद्ध असेल अशी ग्वाही मनसे शहराध्यक्ष राजवीर हजारे यांच्या वतीने देण्यात आली आणि मंगळवेढ्यातील जनतेचे एक स्वप्न ते म्हणजे कृष्ण तलावात भव्य असं संतसृष्टी उभा करणे हे असून त्याचाही पाठपुरा मनसे शहराध्यक्ष राजवीर हजारे व मनसे कडून सुरूच आहे आणि सुरूच राहणार हेही मी आपणासमोर सांगू इच्छितो आणि या 27 फुटी सर्व संतांना घेऊन उभे असलेल्या विठ्ठल मूर्तीमुळे मंगळवेढ्यात एक नवचैतन्य येणार असून आणि अखंड वारकरी समाजाला पण कौतुक वाटेल असेच काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना यापुढेही करत राहणार असल्याचे सांगण्यात आले.


मंगळवेढ्याच्या विकासात कायमची भर पडणार असून आणि मंगळवेढ्यात संपूर्ण विकासाची जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना घेणार असून व सातत्याने पाठपुरावा करून अशीच विविध विकास कामे करण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना कटिबद्ध आहे अशी माहिती राजवीर हजारे शहराध्यक्ष मनसे यांनी दिली.



test banner